मनाेरुग्णाचा त्रास थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:15+5:302021-02-15T04:08:15+5:30

कामठी : शहरातील प्रभाग १५ अंतर्गतच्या विक्तुबाबानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका मनाेरुग्णामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अश्लील शिवीगाळ, ...

Stop suffering from mental illness | मनाेरुग्णाचा त्रास थांबवा

मनाेरुग्णाचा त्रास थांबवा

कामठी : शहरातील प्रभाग १५ अंतर्गतच्या विक्तुबाबानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका मनाेरुग्णामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अश्लील शिवीगाळ, घरावर दगडफेक, जाेरजाेरात ओरडणे, रात्री-अपरात्री शिवीगाळ करणे यामुळे नागरिक विशेषत: महिला त्रासल्या आहेत. या मनाेरुग्णाकडून सर्वसामान्यांना हाेणारा त्रास थांबवा, या मागणीसाठी नगरसेविका संध्या रायबाेले यांच्या नेतृत्वात महिलांनी ठाणेदार संजय मेंढे यांना निवेदन साेपविले आहे.

या मनाेरुग्णामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, त्यास शासकीय मनाेरुग्णालयात दाखल करण्याची मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळात वंदना घुले, सुनीता कटकवार, उमा भाेंडे, पुष्पा मैंद, रंजना कटकवार, पूजा धर्मगडे, निकिता वाघमारे, शकुंतला निनावे, वैष्णवी टाेंगसे, शशिकला मैंद, भुमेश्वरी चव्हाण, सागरता राऊत, ममता शेंदरे आदींचा समावेश हाेता.

Web Title: Stop suffering from mental illness