शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

देवीदेवतांच्या पीओपी मूर्तींची विक्री थांबवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:55 PM

विविध धार्मिक उत्सवांसाठी देवीदेवतांच्या पीओपी मूर्तींची निर्मिती व विक्री थांबविण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विविध धार्मिक उत्सवांसाठी देवीदेवतांच्या पीओपी मूर्तींची निर्मिती व विक्री थांबविण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, यासंदर्भात समान धोरण तयार करण्याचे व दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देशही दिले. पीओपी मूर्ती पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. सरकारने पर्यावरण संवर्धनाबाबत संवेदनशील असायला हवे, असे मतदेखील न्यायालयाने व्यक्त केले.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पाच वर्षांपूर्वी खामगाव येथे पीओपीच्या गणपती मूर्तींची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. पाण्यात विरघळल्या नाहीत अशा मूर्ती डम्पिंग यार्डात फेकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ओमप्रकाश गुप्ता यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून नगर परिषदेचे मुख्याधिकारी धोंडिबा नामवाड व इतरांविरूद्ध भादंविच्या कलम २९५ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला होता. तसेच, स्थानिक आमदारांनी हा मुद्दा लावून धरल्यामुळे नामवाड यांना निलंबित करण्यात आले होते. तपासानंतर सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नामवाड यांनी स्वत:विरुद्धचा एफआयआर व संबंधित खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर करून देवीदेवतांच्या पीओपी मूर्तींची विक्री व वापरावर चिंता व्यक्त केली तसेच वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अजय घारे यांनी कामकाज पाहिले.पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यकपर्यावरणाची काळजी घेणे काळाची गरज आहे. देवीदेवतांच्या पीओपी मूर्ती पाण्यात शिरवल्या जातात. त्यामुळे जलाशये प्रदूषित होतात. त्याचा जलाशयातील जीवचक्रावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेता सरकारने यासंदर्भात योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. पीओपी मूर्तींची निर्मिती व विक्री थांबवली जावी. पीओपी मूर्ती तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. पीओपी मूर्ती शास्त्रीय पद्धतीने नष्ट कराव्यात, असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे