पार्किंगच्या नावावर गाड्या उचलणे थांबवा

By Admin | Updated: July 6, 2014 00:54 IST2014-07-06T00:54:39+5:302014-07-06T00:54:39+5:30

शहरात पार्किंगच्या नावावर सध्या अनधिकृत कारवाई सर्रासपणे सुरू आहे. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते.

Stop picking trains in the name of parking | पार्किंगच्या नावावर गाड्या उचलणे थांबवा

पार्किंगच्या नावावर गाड्या उचलणे थांबवा

‘आप’ची निदर्शने : वाहतूक यंत्रणा सुधारण्याची मागणी
नागपूर : शहरात पार्किंगच्या नावावर सध्या अनधिकृत कारवाई सर्रासपणे सुरू आहे. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते. मात्र या कारवाईतही भेदभाव केला जात आहे, असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या अनधिकृत कारवाईच्या विरोधात शनिवारी विधानभवन रोडवरील वाहतूक विभागासमोर निदर्शने करण्यात आली. आधी पार्किंगची व्यवस्था करा, त्यानंतरच कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे ही जनहिताचीच बाब आहे. परंतु शहरातील बहुतेक रोडवर पार्किंगची व्यवस्था कोठे करण्यात आली आहे, याची कुठलीही माहिती दिली जात नाही. रोडच्या काठावर पिवळे पट्टे दिसेनासे झाले आहेत. नो पार्किंगचे बोर्डही नाहीत. असे असतानाही नो पार्किंगच्या नावावर दुचाकी वाहने सर्रास उचलली जात आहेत. चारचाकी वाहनांवरही कारवाई केली जाते. परंतु जड वाहनांवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही.
नियमानुसार अनधिकृत ठिकाणी वाहन पार्क करण्यात आल्यास त्यावर कारवाई करण्यापूर्वी अगोदर १०० मीटरपर्यंत ऐकायला जाईल अशाप्रकारे ध्वनिक्षेपकावर घोषणा करणे आवश्यक आहे. घोषणा केल्यावर १५ मिनिटे वाट पाहावी. त्यानंतरही वाहन चालक न आल्यास चालान आकारून दंड ठोठावण्यात यावा. एखादा वाहन चालक १० तासापर्यंत आलाच नाही तर अगदी जवळच्या ठिकाणी गाडी घेऊन जावी, परंतु असे होत नाही. वाहन चालकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अगोदर पार्किंगची व्यवस्था करा आणि त्यानंतरच कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक डॉ. देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात अंबरेश सावरकर, ज्योती कन्हेरे, अश्विन मोटघरे, मंगेश तेलंग, कविता सिंगन, जगजित सिंग, रवींद्र गिंदोळे, सतविंदर सिंग, सोनू फटिंग, डॉ. अशोक लांजेवार, संजय देऊळकर, डॉ. जीवतोडे आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stop picking trains in the name of parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.