शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामध्ये हस्तक्षेप करणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:43 IST

सरकारकडून दलित, शोषित पीडित समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वर्णव्यवस्था मानणारे जातीयवादी मानसिकतेचे लोक पुन्हा दलितांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय  आदिम कृती समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात उग्र प्रदर्शन करण्यात आले. संविधानाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असून संविधानाला हात लावाल तर खबरदार, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देआदिमतर्फे संविधान चौकात उग्र प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारकडून दलित, शोषित पीडित समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. वर्णव्यवस्था मानणारे जातीयवादी मानसिकतेचे लोक पुन्हा दलितांना गुलाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय  आदिम कृती समितीच्यावतीने शुक्रवारी संविधान चौकात उग्र प्रदर्शन करण्यात आले. संविधानाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असून संविधानाला हात लावाल तर खबरदार, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.विश्वनाथ आसई, अ‍ॅड. नंदा पराते, दे.बा. नांदकर, धनंजय धापोडकर, चंद्रभान पराते, धनराज पखाले, मनोहर घोराडकर, ओमप्रकाश पाठराबे, प्रकाश दुलवाले, नागोराव पराते, विठ्ठल बाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘संविधानाचा सन्मान झालाच पाहिजे, अ‍ॅट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय असो, हलबांना हिंदू म्हणून बोगस करणे बंद करा....’ आदी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. अ‍ॅड. नंदा पराते म्हणाल्या, प्राचीन इतिहास व पुराव्यांकडे सरकार दुर्लक्ष करून अन्याय करीत आहे. हलबांना कोष्टी ठरवून नोकरीवरून काढण्याचा सपाटा भाजपा सरकारने सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. धर्म, रहिवास व धंद्याच्या नावाखाली आदिवासींना बोगस करण्याचे कृत्य सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती जाळून संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. अ‍ॅट्रासिटी समर्थनातील कोणत्याही आंदोलनास आदिमचा पाठिंबा राहिल, असे जाहीर करण्यात आले. यावेळी आदिम हलबा, हलबी, माना गोवारी, धनगर, धोबा, काळी, मन्नेवार, छत्री, ठाकूर आदी समाजातील शेकडो बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर