शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
5
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
6
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
7
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
8
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
9
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
10
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
11
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
12
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
13
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
14
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
15
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
16
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
17
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
18
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
19
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
20
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!

रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक, जाब विचारणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न

By योगेश पांडे | Updated: March 24, 2023 16:20 IST

पोलिसांना गुन्हेगारांच्या वाकुल्या : तात्या टोपेनगरजवळील मुख्य रस्त्यावर टवाळखोरांच्या कुरापती

नागपूर : शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावककर नगर चौकाजवळील मुख्य रस्त्यावर टवाळखोर तरुणांनी चक्क येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली व जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

रोशन झाडे (३५, बुटीबोरी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान ते त्यांच्या मित्रासोबत एमएलए हॉस्टेलवरून घरी जात होते. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंतेश्वरी झोपडपट्टीजवळील एका रेस्टॉरेन्टसमोर बसलेल्या तरुणांकडून वाहनांवर दगड फेकल्या जात होते. सागर गौतम झारीया (२२, दंतेश्वरी झोपडपट्टी), दुर्योधन मनोहर वर्मा (२२, धनगरपूरा वस्ती बजाजनगर), ओमकार गोवर्धन टेंभरे (२२, अत्रे ले आउट, दलपतशाह नगर, मोनु वर्मा (२०, दंतेश्वरी झोपडपट्टी) या तरुणांकडून ही कुरापत काढण्यात येत होती. या दगडफेकीत काही नागरिकांच्या वाहनांचे नुकसानदेखील झाले.

झाडे हे दुचाकीने जात असताना त्यांनादेखील दगड मारण्यात आला. झाडे यांनी गाडी थांबवून दगड का मारत आहात, असा जाब विचारला. यावर चारही आरोपी संतप्त झाले व त्यांनी झाडे यांना ओढत रस्त्याच्या कडेला नेले व त्यांच्या डोक्यावर मोठा दगड मारून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या दुचाकीचेदेखील नुकसान केले. त्यानंतर आरोपी फरार झाले. झाडे यांना खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व सागर झारिया, दुर्योधन वर्मा व ओमकार ढेंभरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या झोपडपट्टीत गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले अनेक तरुण राहतात. मुख्य रस्त्यावर येऊन अनेकदा हे तरुण गोंधळ घालतात. मात्र पोलिसांची गस्त नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरstone peltingदगडफेक