शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रामदेवबाबा मंदिरातून चक्क घोड्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 21:10 IST

‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’चा लाभ उचलत एका मद्यपीने चक्क रामदेवबाबा मंदिर परिसरातून घोडाच चोरी केल्याची बाब समोर आली आहे. पोलीस ‘लॉकडाऊन’च्या व्यवस्थेत व्यस्त आहेत. याचा फायदा घेत पोलीस ठाण्यापासून काही पावले अंतरावर असलेल्या या घटनेनंतर गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली व घोड्याला शोधून काढले.मंदिराचे पुजारी सोमचंद्र ऊर्फ मुन्ना छांगानी यांच्याकडे बऱ्याच कालावधीपासून पाळीव घोडा आहे. ते मंदिर परिसरातीलच त्यांच्या घरासमोर त्याला बांधून ठेवतात. ११ एप्रिल रोजी कुणीतरी दोरी तोडून घोडा चोरला. छांगानी यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी केली असता महेश नगर निवासी साहिल पटेल रसीद पटेलकडे तसाच दिसणारा घोडा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हुडकेश्वर पिपला फाटा निवासी प्रमोद संपत लाडवे यांनी घोडा दिल्याचे सांगितले. प्रमोद हा घोड्यांचा प्रशिक्षक असून बजाजनगरातील काचीपुरा येथे तो प्रशिक्षण देतो. तेथे संबंधित घोडा सापडला.साहिल हा मद्यपी असून त्याचे वडील प्रॉपर्टी डीलर आहेत. दारुचे व्यसन असल्याने साहिलला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे घोडा विकून पैसे मिळविण्याची त्याची योजना होती. घोडा चोरी केल्यानंतर त्याने फेसबुकवर प्रमोदशी संपर्क केला. घोडा माझ्या मालकीचा असून त्याला प्रशिक्षण द्या असे त्याने प्रमोदला सांगितले. मला साहिलचे सत्य माहीत नव्हते असा दावा प्रमोदने केला आहे. निरीक्षक सुनील गांगुर्डे, पीएसआय साजिद, हवालदार युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान शेख, संतोष शेंद्रे आणि आशीष बावनकर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :theftचोरीTempleमंदिरnagpurनागपूर