शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून : वितरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:34 PM

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात मागील काही दिवसांपासून गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून असल्याची माहिती सामोर आली आहे.

ठळक मुद्देकुटुंबनियोजन कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात मागील काही दिवसांपासून गर्भनिरोधक औषधांचा साठा पडून असल्याची माहिती सामोर आली आहे.लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या वापरावर शासन भर देत आले आहे. यासाठी ‘कॉपर टी’, ‘निरोध’, ‘अंतरा’ नावाची लस, ‘छाया’ नावाच्या तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा शासनाकडून केला जातो. काही महिन्यांपूर्वी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात ‘छाया’ व ‘अंतरा’ नावाची लस उपलब्ध करून देण्यात आली. उपसंचालक कार्यालयाने पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहाही जिल्ह्यांना या गर्भनिरोधक औषधांचा पुरवठा केला. सूत्रानुसार, नागपूरसोडून इतर जिल्ह्यांमधील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (डीएचओ) लाभार्थींना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाटपही सुरू केले. मात्र, नागपूरस्तरावर याचे वाटपच झाले नाही. जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष व आरोग्य सभापतींचे कार्यालयही याबाबत अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे, या औषधीच्या वाटपासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे, उत्तर दिले जात आहे. परंतु प्रशिक्षणाला सुरुवात झाली का, किती जणांना प्रशिक्षण देण्यात येणार याचे उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. परिणामी, शासनाच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :medicinesऔषधंPregnancyप्रेग्नंसी