शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: बीअर शॉपीच्या आतमध्ये ‘बार’; लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 07:05 IST

गोधनी रोडवर सुरुय ‘ए- १’ गोरखधंदा; उत्पादन शुल्क विभाग, पोलिसांची डोळेझाक 

नागपूर : उत्पादन शुल्क विभागातर्फे शहराच्या विविध भागात वाईन शॉपच्या धर्तीवर बीअरच्या विक्रीसाठी ‘बीअर शॉपी’ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. या शॉपीतून फक्त बीअरची विक्री करण्याची परवानगी आहे. ग्राहकाला तेथे बसून पिण्याची परवानगी नाही. असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून गोधनी रोडवरील झिंगाबाई टाकळी परिसरातील ‘ए-१ बीअर शॉपी’च्या आतमध्ये एकप्रकारे ‘बार’ सुरू करण्यात आला आहे. शॉपीचे दार उघडून ग्राहकांना आतमध्ये घेऊन बीअर पिण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. लोकमतने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये संबंधित बाब उघडकीस आली आहे. गोधनी रोडवरील ‘ए-१ बीअर शॉपीला उत्पादन शुल्क विभागाकडून फक्त ‘काऊंटर सेल’ करण्याची परवानगी आहे. मात्र, असे असतानाही येथे समोरचे दार उघडून ग्राहकांना आतमध्ये घेतले जाते व आतील भागात त्यांना बीअर पिण्याची मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ केले असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. ग्राहक बीअर खरेदीसाठी काऊंटरवर येतात. खरेदी केल्यावर  पिण्यासाठी आतमध्ये बसू देण्याची मागणी करतात. सुरुवातीला काऊंटरवरून नकार दिला जातो. मात्र, जरा आग्रह धरला व आपण नियमित ग्राहक असल्याचे सांगितले की खात्री पटवून गुपचूप समोरचे दार उघडले जाते व ग्राहकाला आतमध्ये घेतले जाते. या सेवेच्या बदल्यात जास्त रक्कमही आकारली जाते. या प्रकारामुळे संबंधित बीअर शॉपीला सध्या बारचे स्वरुप आले आहे. 

व्यावसायिकांना त्रास- सुरुवातीला या बीअर शॉपीमधून नियमानुसार काऊंटर सेल व्हायचा. त्यामुळे ग्राहक येऊन खरेदी करून निघून जायचे. आता आतमध्ये बसून बीअर पिऊ लागले आहेत. याचा आजूबाजूच्या व्यावसायिकांना त्रास वाढला आहे. संबंधित व्यावसायिकांनीही या प्रकाराची तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.

टाकळीवासीयांचा बारला विरोध- झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारी लोकवस्ती आहे. या परिसरात कुठलाही बार किंवा वाईन शॉप उघडून नये म्हणून नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली आहे. सध्या सुरू असलेल्या ‘ए-१ बीअर शॉपी’पासून पुढे काही अंतरावरच तीन वर्षांपूर्वी एक बार सुरू होणार होता. तेव्हा परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलन केले व बेत हाणून पाडला. आंदोलनाला यश आले व बार सुरू होणार असलेल्या जागेवर कपड्याचे दुकान सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसानी नियमांचा आडोसा घेत संबंधित ‘ए-१ बीअर शॉपी’ सुरू झाली. आता या शॉपीचे रुपांतर बारमध्ये होऊ लागल्याचे निदर्शनास येताच या परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी चालविली आहे.

मानकापूर पोलिसांचे दुर्लक्ष - ‘ए-१ बीअर शॉपी’ मुख्य गोधनीरोडवर आहे. मानकापूर पोलीस ठाण्यात जाण्यासाठी याच रस्त्याने जावे लागते. दिवसभरात मानकापूर पोलिसांच्या गाड्या याच रस्त्याने ये-जा करतात. या शॉपीला आतमध्ये ‘बार’चे स्वरुप देण्यात आल्याची माहिती या परिसरातील व्यावसायिकांना व नागरिकांना आहे. मात्र, ही बाब गुप्तहेरांची यंत्रणा असलेल्या मानकापूर पोलिसांना कशी दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोरखधंद्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे. 

उत्पादन शुल्क विभाग दखल घेईल का ?- मद्यविक्री नियमबाह्य पद्धतीने होत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार उत्पादन शुल्क विभागाला आहेत. लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ‘ए-१ बीअर शॉपी’ मध्ये सुरू असलेला गोरखधंदा उघडकीस आला आहे. आता उत्पादन शुल्क विभाग याची दखल घेऊन या प्रकाराला लगाम लावणार का, असा प्रश्न आहे.

टॅग्स :nagpurनागपूर