शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

तरीही प्रेत त्यांचे जळाया लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : घरातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित असताना आईच्या मृत्यूचा चटका लावणारा प्रसंग. पती-पत्नी एकाच ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : घरातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित असताना आईच्या मृत्यूचा चटका लावणारा प्रसंग. पती-पत्नी एकाच कोविड सेंटरमध्ये आणि पतीने शेवटचा श्वास घेतला, हे पत्नीलाही कळले नाही. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात नेत असतानाच काही सेकंदातच गेलेला जीव. आताच लाडक्या मित्राने व्हाॅट्सॲपवर चॅटिंग केले आणि क्षणातच त्याच्या मृत्यूची बातमी कळली. पायाखालची वाळूच सरकविणाऱ्या अशा असंख्य घटना प्रत्येकाच्या अवतीभवती दररोज घडत आहेत. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी खांदेकरीही नाहीत. आकटं पकडणारे रक्ताचे कुणीही नाही. ‘राम नाम सत्य’ म्हणणारी मागची रांगही गायब... अशातही उमरेड नगरीत ५९ कोरोनाने मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. ना रक्तसंबंधातील कुणी, ना मित्र ना आप्तस्वकीय ना शेजारी तरीही त्यांचे प्रेत जळाया लागले.

उमरेड येथील एका शववाहिका चालकाच्या या ‘नॉनस्टॉप’ सेवाभावाचे खरोखरच ‘जिगरबाज’ असेच वर्णन करावे लागेल. परसोडी उमरेड येथील दिनेश पंढरी मेहरकुरे असे या जोखीम पत्करून ७ बाय २४ तास सेवा पुरविणाऱ्या चालकाचे नाव आहे. दिनेश मेहरकुरे हे सुमारे १० वर्षांपासून शववाहिका चालवीत आहेत. भगतसिंग नागरी सहकारी पतसंस्था व स्वरगंधा सांस्कृतिक संस्थेच्या वतीने उमरेड परिसरात एकमेव शववाहिका कार्यरत आहे. अतिशय अल्पदर आकारून संस्था ही सेवा अविरतपणे देत आहे. या शववाहिकेचे सारथी बनत दिनेश मेहरकुरेसुद्धा एकमेव चालक म्हणून अखंडपणे रात्री-अपरात्री सेवाकार्य पार पाडत आहेत.

कोरोनाच्या पूर्वी परिस्थिती वेगळी होती. प्रेत हलवायला. इकडून तिकडे नेण्यासाठी आणि खांदा देण्यासाठी अनेक हात मदतीला धावत-पळत होते. आता वर्षभरापासून प्रेत उचलायला माणसेच मिळत नसल्याने आम्ही त्यांचे मित्र आणि आम्हीच त्यांचे नातेवाईक होतो, अशा हळव्या प्रतिक्रिया दिनेश मेहरकुरे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. कधी दिवसभरात पाच तर कधी दहा प्रेत अंत्यविधीसाठी न्यावे लागतात. आतापर्यंत एका दिवशी १३ प्रेत दिनेश यांना न्यावे लागले. एक प्रेत स्मशानभूमीत पोहचवीत नाही तर तोच दुसऱ्या मृत्यूची बातमी कानावर येते. मागील १० वर्षात अशा घटना कधीही घडल्या नाहीत. मी २४ तास सेवा देत राहणार. पैसा महत्त्वाचा नाही. सेवा महत्त्वाची आहे. मदतीसारखे दुसरे पुण्य कोणतेच नाही, अशा भावना दिनेश मेहरकुरे यांनी व्यक्त केल्या.

.....

यांचीही साथ लाखमोलाची

सध्या कोरोना काळात कोविड सेंटरमधून मृतांना अंत्यविधीसाठी घेऊन जाणे. सर्वतोपरी मदत करणे आदी कामे दिनेश मेहरकुरे करतात. भगतसिंग पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचीही हिंमत त्यांना नेहमीच मिळते. सोबतच विकास उराडे, रवी समुद्रे, अजय खोटे, अनिल येवले, मोनल डहाके, पवन उराडे, रवी उपाध्याय, वृषभ हुमणे, गजू नंदनवार, दिलीप रंगारी यांचीही लाखमोलाची साथ या सत्कार्यात मिळते.

....

मागील दहा वर्षात आमच्या चालकाने कधीही रजा घेतली नाही. या शववाहिकेचे ते एकमेव सारथी आहेत. सोबतच कोरोनाच्या कठीण काळात त्यांना जसे जमेल तशी सेवा ते पार पाडतात. त्यांच्या या संपूर्ण कार्याचा आम्हास अभिमान आहे.

- अरविंद हजारे, सचिव, भगतसिंग नागरी सहकारी पतसंस्था, उमरेड