शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार

By Admin | Updated: August 16, 2016 22:18 IST2016-08-16T22:17:54+5:302016-08-16T22:18:59+5:30

उपराजधानीतील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला.

Sticks to students in government ITI | शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार

शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीमार

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 16 - उपराजधानीतील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रियेदरम्यान तणाव निर्माण झाला. संतप्त विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामुळे आयटीआयला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत संतप्त विद्यार्थी परिसरात उपस्थित होते.
आयटीआयची प्रवेशप्रक्रिया चार टप्प्यात घेण्यात आली. हे टप्पे आटोपल्यानंतरदेखील १४९ जागा शिल्लक होत्या. या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थी ह्यआयटीआयह्णमध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थी तर सोमवारी रात्रीपासूनच रांगेमध्ये लागले होते. मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशाची एकच खिडकी होती व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वेगवेगळ्या रांगा होत्या. विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना प्रवेशासाठी ह्यटोकनह्ण देण्यात येत होते. यावेळी काही विद्यार्थी व बाहेरील व्यक्ती रांगेत शिरून ह्यटोकनह्ण घेत असल्याचे निदर्शनास आल्यावर विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. याचदरम्यान, सर्व जागांवर प्रवेश झाले असून आता ह्यटोकनह्ण देण्यात येणार नाही, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी रांगेमध्ये धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी उपस्थित पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. परंतु गर्दी जास्त असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना मुका मार लागला.

Web Title: Sticks to students in government ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.