अस्थिरोगावर ‘स्टेम सेल थेरपी’ वरदान

By Admin | Updated: June 23, 2014 01:25 IST2014-06-23T01:25:19+5:302014-06-23T01:25:19+5:30

‘स्टेम सेल थेरपी’वर संशोधन सुरू आहे. मात्र अस्थिरोगाच्या तीन महत्त्वाच्या भागांमध्ये याचे चांगले रिझल्ट समोर येत आहेत. या थेरपीमुळे दोन हाडांना जोडणारे सांध्यामधील ‘कार्टिलेज’ पुन्हा तयार

'Stem Cell Therapy' on Osteoporosis | अस्थिरोगावर ‘स्टेम सेल थेरपी’ वरदान

अस्थिरोगावर ‘स्टेम सेल थेरपी’ वरदान

विदर्भ आॅर्थाेपेडिक सोसायटी : पदग्रहण सोहळा थाटात
नागपूर : ‘स्टेम सेल थेरपी’वर संशोधन सुरू आहे. मात्र अस्थिरोगाच्या तीन महत्त्वाच्या भागांमध्ये याचे चांगले रिझल्ट समोर येत आहेत. या थेरपीमुळे दोन हाडांना जोडणारे सांध्यामधील ‘कार्टिलेज’ पुन्हा तयार करता येते. कटिबंधाच्या सांध्यामधील (हिप जाईन्ट) गोळा जर खराब झाला असेल तर स्टेम सेल थेरपीने तेथील रक्तप्रवाह वाढविता येतो आणि फ्रॅक्चर जुळत नसेल किंवा त्याला बराच वेळ लागत असेल तर या थेरपीने बोन्सचे सेल्स टाकणे शक्य होते, अशी माहिती विदर्भ आॅर्थाेपेडिक सोसायटीचे नवनिर्वाचित सचिव डॉ. मनोज पहुकर यांनी दिली.
चिटणवीस सेंटर येथे रविवारी विदर्भ आॅर्थाेपेडिकस सोसायटीच्या पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित सायंटिफीक कार्यक्रमात ते बोलत होते.
पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध आर्थाेपेडिक सर्जन डॉ. संजय अगरवाला, महाराष्ट्र आॅर्थाेपेडिक असोसिएशनचे सचिव डॉ. नितीन देशपांडे, इंडियन आर्थाेपेडिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर बाभुळकर, विदर्भ आर्थाेपेडिक सोसायटीचे (व्हीओएस) संस्थापकीय सचिव डॉ. किरण सावजी उपस्थित होते.
डॉ. देशपांडे म्हणाले, पूर्वी फ्रॅक्चर झाल्यास मोठा चिरा द्यावा लागायचा. परंतु आता छोट्यात छोटा चिरा देऊन हाडाची जोडणी करणे शक्य झाले आहे. यामुळे रक्तस्राव फार कमी होतो. रु ग्णांना जास्त वेळ थांबण्याची गरज नाही. अतिशय सोपी आणि कमी त्रासाची ही पद्धती समोर येत आहे. या शिवाय ‘स्टेम सेल थेरपी’ ‘जॉर्इंट रिप्लेसमेन्ट’साठी वरदान ठरू शकेल, असेही ते म्हणाले.
नव्या तंत्रज्ञानामुळे आॅर्थाेपेडिकमध्ये सुधारणा
डॉ. अगरवाला म्हणाले, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आॅर्थाेपेडिकमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. पूर्वी असंभव वाटत असलेल्या अनेक गोष्टी आता शक्य होत आहेत. पूर्वी ‘नी रिप्लेसमेन्ट’ किंवा ‘हिप जॉर्इंट रिप्लेसमेन्ट’केल्यावर रुग्णाला जमिनीवर बसणे अशक्य व्हायचे. त्याच्या अनेक हालचालीवर प्रतिबंध यायचा. आता तसे राहिले नाही. दहा वर्षांआधी ‘जॉर्इंट रिप्लेसमेन्ट’ सात ते आठ वर्षे चालायचे, आता पचंवीस ते तीस वर्षांची मर्यादा ओलांडली आहे. येत्या काळात ‘स्टेम सेल थेरपी’ आणि ‘थ्री डी प्रिंटींग’मुळे मानवी जीवन आणखी सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
शस्त्रक्रिया टाळण्यावर भर
विदर्भ आर्थाेपेडिक सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील म्हणाले, अस्थिरोगामध्ये जिथे शस्त्रक्रिया टाळणे शक्य आहे, तिथे तसा प्रयत्न करण्यावर सोसायटी भर देईल. प्रत्येक महिन्याला क्लिनिकल बैठक घेण्यात येईल. यात नवीन संशोधनावर चर्चा करण्यात येईल. युवा सर्जनना अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यावर्षी सोसायटीचे वार्षिक संमेलन अकोल्यामध्ये आयोजित केले जाईल.
कार्यक्रमाला सोसायटीचे माजी सचिव डॉ. रवी भजानी, अध्यक्ष डॉ.देवाशिस बॅरिक, डॉ. नाविद अहमद, डॉ. आर.एम. चांडक, डॉ. मुकेश संचेती, डॉ. संदीप अग्रवाल, डॉ. विराज शिंगाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Stem Cell Therapy' on Osteoporosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.