शेतातील गाेठ्यातून शेळ्यांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:11 IST2021-08-20T04:11:47+5:302021-08-20T04:11:47+5:30

उमरेड : अज्ञात चाेरट्याने शेतातील गाेठ्यातून तीन बाेकड व दाेन शेळ्या चाेरून नेल्या. या शेळ्यांची एकूण किंमत ४४ हजार ...

Stealing goats from the field | शेतातील गाेठ्यातून शेळ्यांची चाेरी

शेतातील गाेठ्यातून शेळ्यांची चाेरी

उमरेड : अज्ञात चाेरट्याने शेतातील गाेठ्यातून तीन बाेकड व दाेन शेळ्या चाेरून नेल्या. या शेळ्यांची एकूण किंमत ४४ हजार रुपये आहे. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील केसलापार (रिठी) शिवारात साेमवारी (दि.१६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

गणेश देवराव फरकाडे (२५, रा. प्लाॅट नं. १५, वाघमारे ले-आऊट, उमरेड) यांची केसलापार (रिठी) शिवारात शेती असून, त्यांच्या शेतात गाेटफार्म आहे. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने गाेठ्याचे कुलूप ताेडून तेथील ३० हजार हजार रुपये किमतीचे तीन बाेकड आणि १४ हजार रुपये किमतीच्या दाेन शेळ्या चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच फरकाडे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे.

Web Title: Stealing goats from the field