शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीच्या कार्यवाहीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:50 IST

राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचे निर्देश : सेवाज्येष्ठता ठरविण्यावरून गुंतागुंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे.शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठरविण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच शासनाच्या १४ नोव्हेंबर २०१७ च्या परिपत्रकात बरीच तफावत आहे. एमईपीएस विनियम अधिनियम १९७७ च्या अनुसूची (फ) नुसार शिक्षकांचे प्रवर्ग पाडण्यात आले आहे. त्यातील संवर्ग (क) मध्ये जेव्हा एखादा शिक्षक बी.एड. ही व्यावसायिक अर्हता प्राप्त करतो, तेव्हापासून तो संवर्ग (क) मध्ये येतो. तेव्हापासून त्याची सेवाज्येष्ठता ठरवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. सेवाज्येष्ठतेवरून एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तर शासनाच्या परिपत्रकानुसार जेव्हा शिक्षकाची शाळेत नियुक्ती होते, तेव्हापासून त्याची सेवाज्येष्ठता ठरवावी, असा उल्लेख होता. त्यामुळे शालेय शिक्षण विभागापुढे शिक्षकांची सेवाज्येष्ठता व पदोन्नतीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीसंदर्भातील कार्यवाहीला शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.ही गुंतागुंत सुटेपर्यंतच्या कालावधीकरिता शाळेतील आर्थिक व दैनंदिन कार्यालयीन कामकाज पार पाडण्याकरिता संबंधित शाळेतील सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकास प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार नियमानुसार सोपवावा, अशा सूचना केल्या आहेत. परंतु हा कार्यभार सोपविताना, सेवाज्येष्ठता कुठल्या नियमाने ठरवावी, असे कुठलेही स्पष्ट निर्देश विभागाने दिलेले नाही. अनेक मुख्याध्यापक होतील शिक्षकअनेक खासगी अनुदानित संस्थांमध्ये संचालकाच्या मर्जीनुसार सेवाज्येष्ठता डावलून मर्जीतील शिक्षकांना मुख्याध्यापक पदावर बसविले आहे. शिक्षण विभागाने निष्पक्ष कारवाई केल्यास, अनेक मुख्याध्यापक परत शिक्षक बनणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र