होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी घरातच राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST2021-03-28T04:09:05+5:302021-03-28T04:09:05+5:30
नागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यंदा सार्वजनिक होळी आणि धूलिवंदन सार्वत्रिक साजरे करण्यावर ...

होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी घरातच राहा
नागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यंदा सार्वजनिक होळी आणि धूलिवंदन सार्वत्रिक साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तेव्हा होळी व धूलिवंदन उत्सव नागरिकांनी अत्यंत साधेपणाने, घरामध्येच साजरा करा, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मेयो, मेडिकल व जिल्हा आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांशी दररोज संपर्कात आहे आणि आढावा घेत आहेत. निर्देशानुसार प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करीत आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनीदेखील चाचणी आणि लसीकरणासाठी सहकार्य करतानाच रस्त्यावरील गर्दी कमी होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.