शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:35 IST

नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे.२०१९ ते २०१४ या कालावधीसाठी ‘नॅक’ बंगळुरूच्या ‘पिअर’ चमूने १७ व १८ मे रोजी शासकीय विज्ञान संस्थेला भेट देऊन सखोल पाहणी केली होती. संस्थेतील पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा, संशोधनाची व्याप्ती इत्यादींबाबत त्यांनी माहिती घेतली होती. याशिवाय माजी विद्यार्थी, विद्यार्थी, पालक इत्यादींशी संवाददेखील साधला. विविध पदवी, पदव्युत्तर विभागातील प्रगतीचा आलेख, संशोधनकार्य, इत्यादीबाबत बारीकसारीक बाबींची चिकीत्सा केली होती. निरीक्षणानंतर ‘नॅक’च्या चमूने मुख्यालयाला अहवाल पाठविला व काही दिवसांअगोदर संस्थेला ‘अ’ दर्जा मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. शासकीय विज्ञान संस्थेची इमारत ही ब्रिटिशकालीन असून ‘हेरिटेज’ दर्जा प्राप्त झाला आहे हे विशेष.शासकीय विज्ञान संस्थेला ‘अ’ दर्जा मिळाला ही समाधानाची बाब आहे. आम्ही जे ध्येय घेऊन निघालो होतो त्यात यश मिळाले. याचे श्रेय संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना जाते. सर्वांनी एकत्रितपणे एक ‘टीम’ म्हणून काम केले होते, अशी भावना डॉ.आत्राम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :scienceविज्ञानcollegeमहाविद्यालयnagpurनागपूर