आरोपींचे बयाण ७ रोजी नोंदवणार

By Admin | Updated: June 25, 2015 03:14 IST2015-06-25T03:14:43+5:302015-06-25T03:14:43+5:30

बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्यातील दोन्ही आरोपींचे बयाण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ७ जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात नोंदवले जाणार आहे.

The statements of the accused will be recorded on 7th | आरोपींचे बयाण ७ रोजी नोंदवणार

आरोपींचे बयाण ७ रोजी नोंदवणार

युग चांडक हत्याकांड खटला : सत्यनारायण जयस्वाल यांची साक्ष पूर्ण
नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण-खून खटल्यातील दोन्ही आरोपींचे बयाण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ७ जुलै रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात नोंदवले जाणार आहे.
राजेश दवारे आणि अरविंद सिंग, अशी या आरोपींची नावे आहेत. बुधवारी तपास अधिकारी सत्यनारायण जयस्वाल यांची साक्ष पूर्ण झाली. या खटल्यात आतापर्यंत ५० साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या आहेत. साक्षी पुरावे नोंदवण्याचे काम संपुष्टात आले आहे.
दोन्ही आरोपींच्या बयाणानंतर सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद होईल, त्यानंतर या खटल्याचा निकाल लागेल. जुलैअखेरपर्यंत निकालाची अपेक्षा आहे.
न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय आणि अ‍ॅड. राजेश्री वासनिक काम पहात आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The statements of the accused will be recorded on 7th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.