सलून दुकानदार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:58+5:302021-04-11T04:08:58+5:30
नागपूर : नाभिक एकता मंच सलून दुकानदार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना दुकाने उघडण्याच्या परवानगीसाठी निवेदन देण्यात आले. ब्रेक ...

सलून दुकानदार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर : नाभिक एकता मंच सलून दुकानदार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना दुकाने उघडण्याच्या परवानगीसाठी निवेदन देण्यात आले. ब्रेक द चेनअंतर्गत लावलेल्या निर्बंधांमुळे सलून दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे सलून कारागीर, दुकानदार, ब्यूटी पार्लर व्यावसायिकांच्या परिस्थितीचा विचार करून शासनाने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, यावर तीन दिवसांत सकारात्मक निर्णय द्यावा, अन्यथा कायदेभंग करू, अशा आशयाचे निवेदन पूर्व नागपूर अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या नेतृत्वात देण्यात आले. टेलिफोन एक्स्चेंज चौकात दुकानदारांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी मामा राऊत, शेषराव घुमे, दिलीप लक्षणे, संजय उमरकर, मुरलीधर चन्ने, शिवशंकर गाडगे, राजकुमार सेन, दुर्गा कडू, लखन उरकुडे, नंदलाल अतकर, विक्की साखरकर, प्रकाश ठमेकर, विकास लाखे, अविनाश वलोकर आदींची उपस्थिती होती.