राज्य सरकार केवळ बोलघेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:49 IST2019-07-04T13:48:44+5:302019-07-04T13:49:14+5:30

विद्यमान सरकारमध्ये यापूर्वीही भ्रष्टाचारी मंत्री होते, तसेच ते आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. पण मुख्यमंत्री केवळ क्लीनचीट देतात असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला.

State Government only speaks | राज्य सरकार केवळ बोलघेवडे

राज्य सरकार केवळ बोलघेवडे

ठळक मुद्देशेवटच्या अधिवेशनातून जनतेला काहीही मिळाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विद्यमान सरकारमध्ये यापूर्वीही भ्रष्टाचारी मंत्री होते, तसेच ते आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. पण मुख्यमंत्री केवळ क्लीनचीट देतात असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केला. विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचे प्रथमच नागपुरात आगमन झाले आहे.
देश व संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांची गरज आहे असे प्रतिपादन करून त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व त्यांनीच करावे अशी भूमिका मांडली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत मात्र त्यांची भाषा ही ते आघाडीबाबत गंभीर नसल्याची आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांनी आघाडीबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असेही ते पुढे म्हणाले.

Web Title: State Government only speaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.