शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्य ग्राहक आयोगाच्या अधिकारांना कात्री : राज्य शासनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:58 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जिल्हा ग्राहक मंचने दिलासा दिल्यानंतरही ग्राहकांच्या अडचणी कायम राहणार आहे. या संदर्भात ग्राहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देग्राहकांना अंमलबजावणीसाठी दिवाणी न्यायालयात जावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाच्या अंमलबजावणीचे अधिकार दिवाणी न्यायालयांना देण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. अशा आदेशाचे परिपत्रक राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती ए.पी. भंगाळे यांनी जारी केले आहेत. परिपत्रकानंतर जिल्हा ग्राहक मंचने दिलासा दिल्यानंतरही ग्राहकांच्या अडचणी कायम राहणार आहे. या संदर्भात ग्राहक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाय उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.ग्राहकांना दिवाणी न्यायालयांमध्ये न्यायासाठी करावी लागणारी प्रदीर्घ प्रतीक्षा टाळण्यासाठी केंद्र शासनाने अंमलबजावणीचे अधिकार ग्राहक आयोगाकडे दिले आहेत. पण राज्य शासनाने या तरतुदींशी विसंगत निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागेल, असा ग्राहक संघटनांचा आक्षेप आहे.जलद न्यायासाठी सन १९८६ मध्ये केंद्राचा कायदाग्राहकांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा आणि फसवणुकीविरुद्ध न्याय मिळावा, यासाठी केंद्र शासनाचा सन १९८६ मध्ये कायदा आला. तसेच ग्राहकांना दिवाणी न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे चकरा मारायला लागू नयेत, याकरिता केंद्रीय व राज्य स्तरावर आयोग आणि जिल्हा पातळीवर ग्राहक मंचची स्थापना करण्यात आली. आयोग व मंचने ग्राहकांच्या तक्रारीवर कंपनी, बिल्डर किंवा इतरांविरोधात दंड किंवा अन्य दिवाणी स्वरुपाचे आदेश दिल्यावर संबंधितांनी त्याचे पालन न केल्यास तुरुंगवास किंवा फौजदारी शिक्षा सुनावण्याचे ग्राहक आयोग व मंचचे अधिकार अबाधित आहेत.जिल्हा ग्राहक मंचने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास ग्राहकाला राज्य आयोगाकडे दाद मागता येत होती. पण राज्य शासनाने ग्राहक संरक्षण नियमावलीत नियम १४ (६) मध्ये बदल करून ग्राहक न्यायालयांचे अंमलबजावणीचे आदेश काढून घेतले आहेत. आयोगाकडे आलेले असे सर्व अर्ज दिवाणी न्यायालयात पाठविण्यात येतील, असे परिपत्रक राज्य आयोगाने काढले आहे. त्यमुळे ग्राहकांना जलद न्याय मिळण्याऐवजी दिवाणी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतील, असे ग्राहक संघटनांचे मत आहे.कायद्यात कलम २५ द्वारे ग्राहकांना दिलासासन १९८६ मध्ये ग्राहक कायदा आला. २००३ मध्ये ग्राहकांना असेच दिवाणी न्यायालयात जावे लागत होते. तेथे आदेशाच्या अंमलबजावणीवर निर्णय देण्यास बराच वेळ लागत होता. यामुळे २००३ मध्ये या कायद्यात सुधारणा करीत ग्राहकांना कलम २५ द्वारे दिलासा देण्यात आला. आयोगाच्या आदेशांचे पालन कंपनी, दुकानदार, विकासक किंवा अन्य कोणत्याही प्रतिवादीने न केल्यास तक्रारदाराने अर्ज केल्यावर आयोग किंवा मंच कलम २५ नुसार अंमलबजावणीसाठी दिवाणी निर्देश जारी करते. ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्यावर महसूल संहितेतील तरतुदींनुसार जप्तीची कारवाई केली जाते. पण आता नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने आता मंचकडे दाद मागण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार नाही. आयोग व मंचच्या आदेशाची अंमलबजावणी संबंधितांनी न केल्यास ग्राहकाला दिवाणी न्यायालयाकडे पुढील कारवाईसाठी जावे लागणार आहे.ग्राहक संरक्षणाच्या मूळ उद्देशाला हरताळकलम २५ नुसार संबंधित दोषी ग्राहक मंचच्या आदेशाची विहीत कालावधीत अंमलबजावणी करीत नसल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना कलम २५ ने दिले होते. पण आता राज्य शासनाने पुन्हा या कायद्यात बदल केल्याने ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षणाच्या मूळ उद्देशाला यामुळे हरताळ फासला गेला आहे.राज्य ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीसपरिपत्रकासंदर्भात मुंंबई ग्राहक पंचायतने राज्य शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यातील कलम २५ शी विसंगत असा कुठलाही नियम किंवा बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. ग्राहकविरोधी निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास ग्राहक पंचायततर्फे जनहित याचिकेद्वारे कायदेशीर आव्हान देण्यात येणार आहे.अधिकार अबाधित राहावेग्राहकांना जलदगतीने न्याय मिळावा, याकरिता राज्य आयोग व मंचचे अधिकार अबाधित राहावे. त्याला कात्री लागू नये. दिवाणी न्यायालयात गेल्यास वेळ लागेल. ग्राहकांना न्याय मिळणार नाही.गजानन पांडे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री,अ.भा. ग्राहक पंचायत.अधिकाराला बाधा पोहोचू नयेकेंद्र शासनाच्या ग्राहक कायद्याद्वारे ग्राहकांना जलदगतीने न्याय मिळावा. आयोग वा मंचच्या अधिकाराला बाधा पोहोचू नये. त्यांचे अंमलबजावणीचे अधिकार कायम असावेत. ग्राहक कायद्याचे अस्तित्व कायम राहावे.देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव,अ.भा. ग्राहक कल्याण परिषद.

टॅग्स :consumerग्राहकMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार