अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

By Admin | Updated: December 15, 2015 01:59 IST2015-12-15T01:59:40+5:302015-12-15T01:59:40+5:30

नवे कृषी तंत्रज्ञान; शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद; विविध कार्यक्रमांची रेलचेल.

State Agricultural Agriculture Exhibit in Akola! | अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

अकोल्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन!

अकोला : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११७ व्या जयंतीदिनानिमित्त येत्या २७ ते २९ डिसेंबरपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अँग्रोटेक-२0१५चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवे कृषी तंत्रज्ञान, शेतकरी-शास्त्रज्ञ संवादासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. बदलते हवामान आणि पावसाची अनिश्‍चितता, या पार्श्‍वभूमीवर हे प्रदर्शन राज्यातील शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत होत असलेल्या या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३00 च्यावर विविध कृषी तंत्रज्ञान, नव्या संशोधनाची माहिती उपलब्ध असणार असून, यावेळी शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकही बघायला मिळणार आहे. नवनवीन संकल्पना अणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करणे अनिवार्य झाले आहे. शेतकर्‍यांचा प्रतिसादही या तंत्रज्ञानाकडे वाढला आहे. शेतकर्‍यांना व्यावसायिक संधीची माहिती हवी आहे. या कृषी प्रदर्शनात ती व्यवस्था करण्यात आली आहे. या कृषी प्रदर्शनांतर्गत कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादने निर्मिती करणार्‍या खासगी कंपन्या, प्रगत उत्पादने आणि यंत्राचे सादरीकरण, पाणी, खते आणि कीटकनाशक ांचा कमीतकमी वापर करू न भरपूर उत्पादने मिळवण्यासाठीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी मांडले जाणार आहे. या प्रदर्शनात कृषी विद्यापीठ व संलग्न कृषी संस्थांची दालने तसेच कृषी विभाग, कृषी अवजारे व उत्पादने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, ग्रामीण व्यवसाय, कृषी व ग्रामीण उद्योग आदी दालनांसह कृषी व कृषी संलग्नित योजनांची माहिती, फळ व भाजीपाला प्रदर्शन यासह बचत गटांचा सहभाग व विद्यापीठांच्य प्रकाशनाची रेलचेल येथे असेल. शेतकरी फूलशेतीकडे वळल्याने फूलशेती व वनौषधीबाबतची माहिती येथे उपलब्ध असेल. कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास ऊस, कृषी अभियांत्रिकी विभागाची उत्पादने येथे ठेवली जाणार आहेत.

Web Title: State Agricultural Agriculture Exhibit in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.