शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM

हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सोमवार १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देसभापती व अध्यक्षांनी घेतला तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सोमवार १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.विधान मंडळाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीस विधान मंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुदेश मेश्राम, विधानसभेचे अवर सचिव रवींद्र जगदाळे, विधीमंडळाचे प्रमुख सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.विधानभवन, रविभवन आमदार निवास परिसरावर सीसीटीव्हीने नजरविधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त करावयाच्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मागील बैठकीत चर्चा करण्यात आलेल्या बाबींवर केलेली कार्यवाही विषयक माहिती देण्यात आली. यामध्ये विधान भवन आमदार निवास व रविभवन तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ५४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. तसेच मोर्चाच्या ठिकाणी पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी ४५ मोर्चाचे निवेदन व ३३ धरणे आंदोलनाची नोंद झालेली असून त्याठिकाणी सुरक्षा आणि इत्तर आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले.महिलांच्या सुरक्षेकडे लक्षमहिला आमदारांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या निवासस्थानी महिला सेविका आणि पर्यवेक्षक नेमावे अशी सूचना उपसभापती नीलम गोºहे यांनी केली. यावेळी त्या म्हणाल्या, आमदार निवासी राहणार असणाºया आणि नसणाºया महिला आमदारांची नोंद घेऊन त्याच्या सहमतीने राहत असलेल्या इत्तर व्यक्तीची नोंदवहीत नोंद घेण्यात यावी. त्याबरोबर अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असणाºया महिला पोलिसांना आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपसभापती गोºहे यांनी केल्या.स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचनाविधानमंडळ परिसर, आमदार निवास, रविभवन तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरात स्वच्छतेसोबतच पाणी पुरवठ्याच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. विविध कामांची गुणवत्ता सांभाळावी तसेच आमदार निवासाच्या उपहारगृहातील खाद्यपदार्थाचा दर्जा राखण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विधिमंडळ परिसरात निर्माणाधीन असलेल्या वास्तूच्या उभारणीत विविध सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी संबंधित विभागांनी आपापसात समन्वय साधून विधिमंडळ सुरक्षेसाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..पासेसशिवाय कुणालाही प्रवेश नाहीअधिवेशन कालावधीत अधिकृत सुरक्षा पासेसशिवाय परिसरात प्रवेश राहणार नाही. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी आणि संबंधितांनी सुरक्षा पास जवळ बाळगावेत. विधानभवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, मुख्य प्रवेशद्वारावर डिजिटल छायाचित्र घेणारी अत्याधुनिक यंत्रणा स्थापित करण्यात आली आहे. स्कॅनर्स मशीनसुध्दा बसविण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली. अधिवेशन काळात विधान भवन, विधान भवनाबाहेरील परिसर, आमदार निवास, रविभवन, १६० खोल्यांचे गाळे आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने अंतर्गत व बाह्य सुरक्षा चोख ठेवण्यात आली असून, गाड्यांचा पार्किंगची व्यवस्थासुध्दा करण्यात आल्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी सांगितले. विधान भवन, रविभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे, सुयोग पत्रकार भवन येथे वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच २११ डॉक्टर, नर्सेस यांचे वैद्यकीय पथक अधिवेशनात उपलब्ध करुन देण्यात आले असून रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे अशी महिती वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी दिली.रविभवनातील कॉटेज भाड्यावररविभवन येथील मंत्र्यांचे कॉटेजेस अधिवेशनानंतर फारसे वापरात येत नाही. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि कॉटेज उत्तम राहण्यासाठी ते भाड्याने देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सभापती रामराजे निंबाळकर यांनी बैठकीत दिला. त्याचबरोबर पुढील काळात विधान भवन नागपूर अशी आस्थापना निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन