शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावापुढील नव्या पुलाची दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:20 IST

Nagpur : उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 'पीडब्ल्यूडी'ला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अंबाझरी तलावापुढील रस्त्यावरील नवीन पुलाची दुसरी बाजू येत्या डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करा, असे निर्देश उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.

अंबाझरी तलावापुढील रस्त्यावरचा जुना पूल अरुंद होता. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराकरिता तो पूलही कारणीभूत होता. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला आहे. पुलाची एक बाजू ११ ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली तर दुसऱ्या बाजूची काही कामे बाकी आहेत. ती कामे तातडीने पूर्ण करा, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले आहे. उच्चस्तरीय समितीची बैठक २८ ऑक्टोबर रोजी झाली. या बैठकीत इतरही कामांचा आढावा घेण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंबाझरी तलावाची सुरक्षा भिंत बळकट करण्याचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली. तसेच पाणी सोडण्याची दारे बांधण्यासाठी दोनदा निविदा नोटीस प्रकाशित करण्यात आली, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याकरिता, पर्यायी उपायांवर विचार केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, महामेट्रो संचालकांनी क्रेझी कॅसल परिसरामध्ये नाग नदीचे पात्र १८ मीटर रुंद करण्याचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा केला

पीडित नागरिकांची याचिका प्रलंबित गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. परिणामी, रामगोपाल बाचुका व इतर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा, इत्यादी मागण्या केल्या आहेत. या प्रकरणात हे प्रतिज्ञापत्र दाखल केले गेले आहे. संबंधित उच्चस्तरीय समिती न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झाली आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूरroad transportरस्ते वाहतूक