ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

By Admin | Updated: September 19, 2015 03:56 IST2015-09-19T03:56:00+5:302015-09-19T03:56:00+5:30

पंतप्रधान ग्राम सडक योजना व सेंट्रल रोड फंड अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा, असे निर्देश खा. कृपाल तुमाने यांनी अधिकाऱ्यांनी दिले.

Start the rural road works immediately | ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा

कृपाल तुमाने यांचे निर्देश : पीएमजीएसवाय व सीआरएफची बैठक
नागपूर : पंतप्रधान ग्राम सडक योजना व सेंट्रल रोड फंड अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा, असे निर्देश खा. कृपाल तुमाने यांनी अधिकाऱ्यांनी दिले.
तुमाने यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची रविभवन येथे बैठक घेतली. बैठकीला पीएमजीएसवायचे अधीक्षक अभियंता पाटील, सीआरएफचे अधीक्षक अभियंता ठेंग, कार्यकारी अभियंता पोहेकर, भानुसे, माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाध्यक्ष राजू हरणे, पांडुरंग बुराडे, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर आदी उपस्थित होते.
या वेळी तुमाने यांनी दोन्ही योजनांतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. सीआरएफ अंतर्गत नागपूर जिल्ह्यासाठी ११९२ कोटी मंजूर झाले असून ३५ कोटी मिळाले आहेत. त्यामुळे एकाच तालुक्यातील जास्त रस्त्यांची कामे सुरू न करता प्रत्येक तालुक्यातील एका रस्त्याचे काम सुरू करावे, अशा सूचना तुमाने यांनी दिल्या. पीएमजीएसवाय अंतर्गत केंद्राकडे ४५ कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनी कामे सुरू केलेली नाहीत. काही कामे रखडली आहेत. मागील आठवड्यात केंद्र सरकारने २९० कोटी रुपये राज्यासाठी दिले आहेत. त्यातील काही निधी नागपूर जिल्ह्यासाठी मिळणार आहे. त्यातून कामे सुरू करता येतील. त्यामुळे पूर्वतयारी करून ठेवा, असेही निर्देश तुमाने यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Start the rural road works immediately