कालभैरव मंदिर-मिलिटरी रब्बानी क्रीडांगण मार्ग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST2021-02-12T04:10:08+5:302021-02-12T04:10:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील कालभैरव मंदिर ते मिलिटरी रब्बानी क्रीडांगण मार्ग सुरू करण्यात यावा, अशी मागणी ...

कालभैरव मंदिर-मिलिटरी रब्बानी क्रीडांगण मार्ग सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील कालभैरव मंदिर ते मिलिटरी रब्बानी क्रीडांगण मार्ग सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून, यासाठी त्यांनी छावणी बाेर्डाचे मुख्याधिकारी अभिजीत सानप यांना निवेदन दिले आहे.
नागरिक कन्हान नदी परिसराकडे जाण्यासाठी या मार्गाचा कित्येक वर्षांपासून वापर करत हाेते. काेराेना संक्रमण काळात मिलिटरी प्रशासनाने हा मार्ग मध्येच खाेदून बंद केला. त्यामुळे नागरिकांना कन्हान नदी परिसर, कॅन्टाेनमेंट परिसर व रब्बानी क्रीडांगणाकडे जाण्यासाठी विविध समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. ही समस्या साेडविण्यासाठी हा मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
मुख्याधिकारी अभिजीत सानप व कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. मिलिटरी प्रशासनाशी चर्चा करून ही समस्या मार्गी लावण्याची ग्वाही या दाेन्ही अधिकाऱ्यांनी दिली. या शिष्टमंडळात माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संजय कनोजिया, उज्ज्वल रायबोले, राजे खंडेलवाल, संध्या रायबोले, लालसिंग यादव, प्रतीक पडोळे, सुषमा सिलाम, छावणी बोर्डाचे उपाध्यक्ष दीपक सिरिया, दिनेश स्वामी, प्रेमेंद्र यादव, कमल यादव, विजय कोंडूलवार यांच्यासह नागरिकांचा समावेश हाेता.