कुही, मांढळ येथे काेविड केअर सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:49+5:302021-04-20T04:08:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : तालुक्यातील वाढते काेराेनाबाधित रुग्ण व मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाहता, प्रशासनाने आतातरी तालुक्यात काेविड केअर ...

Start a Cavid Care Center at Kuhi, Mandhal | कुही, मांढळ येथे काेविड केअर सेंटर सुरू करा

कुही, मांढळ येथे काेविड केअर सेंटर सुरू करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : तालुक्यातील वाढते काेराेनाबाधित रुग्ण व मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाहता, प्रशासनाने आतातरी तालुक्यात काेविड केअर सेंटर सुरू करावे, जेणेकरून तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळून ते काेराेनामुक्त हाेतील. याकडे लाेकप्रतिनिधींनीही लक्ष देत कुही व मांढळ येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील यांच्यामार्फत प्रशासनाकडे केली आहे.

तालुक्यात आतापर्यंत ५४ जणांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या दाेन दिवसात नागपूर येथील मेडिकल व मेयाे हाॅस्पिटलमधील व्यवस्था पाहून दाेन रुग्णांना उपचार न घेताच गावी परतावे लागले. याेग्य उपचार न झाल्याने आजनी व मांढळ येथील दाेघांचा मृत्यू झाला. नागपुरात रुग्णांना बेड, ऑक्सिजन व रेमडेसिविरसाठी भटकावे लागत आहे. यात रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही माेठी गैरसाेय हाेत आहे. याकडे क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने व आमदार राजू पारवे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कुही व मांढळ येथे काेविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कुही ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रांसह सर्व शासकीय रुग्णालयांत तज्ज्ञ डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांची ४० टक्केे पदे रिक्त आहेत. अतिशय अल्प प्रमाणात डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तालुक्यातील आराेग्य सेवेचा डाेलारा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

....

तज्ज्ञ डाॅक्टर व परिचारिकांची आवश्यकता

कुही येथील सिल्ली रोडवरील मुलांच्या वसतिगृहात काेविड सेंटर सुरू केले आहे. येथे राेज ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. काेराेनाबाधित रुग्णांना विलगीकरण सुविधाही करण्यात आली आहे. याठिकाणी ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित व अनुभवी डॉक्टर आणि परिचारिकांची आवश्यकता आहे. मात्र, तिथे नव्यानेच नियुक्त केलेले डॉक्टर व परिचारिका आहेत. काेविड केअर सेंटरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी किमान दाेन तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Start a Cavid Care Center at Kuhi, Mandhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.