ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:59+5:302020-12-26T04:07:59+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माेहपा : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केली आहे. ग्रामीण भागात अद्यापही एसटी ...

Start bus services in rural areas | ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करा

ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करा

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेहपा : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केली आहे. ग्रामीण भागात अद्यापही एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य हाेत नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माधव चर्जन व पालकांनी केली असून, माेहपा (ता. कळमेश्वर) येथील न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश आदमने यांनी नागपूर आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

माेहपा येथे तीन हायस्कूल व एक कनिष्ठ महाविद्यालय तर परिसरातील घोराड, लोहगड, डोरली, कोहळी, पिपळा, परसोडी, मांडवी, तेलगाव येथे प्रत्येकी एक हायस्कूल आहे. डोरली, राऊलगाव, पारडी, रामगिरी, कोहळी, बुधला, लोहगड, मांडवी, नांदिखेडा, तेलगाव, तिडंगी, पिपळा, मडासावंगी, कन्याढोल, परसोडी, उबाळी, वाढोणा, घोराड व कळमेश्वर येथील शेकडाे विद्यार्थी माेहपा येथे शिक्षणासाठी बसने नियमित ये-जा करतात. काेराेना संक्रमणामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्याने माेहपा येथील शाळादेखील बंद हाेत्या.

शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू केल्याने माेहपा येथील शाळा सुरू करण्यात आल्या. काेराेना संक्रमण टाळण्यासाठी या शाळांमध्ये शासनाच्या आदेशानुसार सर्व उपाययाेजना करण्यात आल्या. परंतु, ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना माेहपा येथे शाळेत येण्यासाठी काेणतेही साधन नाही. बहुतांश विद्यार्थी गरीब व सामान्य घरांमधील असल्याने त्यांच्याकडे स्वतंत्र वाहनांची साेय नाही. शिवाय, ग्रामीण भागात खासगी प्रवासी वाहतूकदेखील सुरू झालेली नाही.

काही पालक त्यांच्या पाल्यांना दुचाकींनी शाळेत साेडून देतात. मात्र, शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी परत जाण्यासाठी अडचणी येतात. त्यांना राेज शाळेत ने-आण करणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नाही, असेही पालकांनी सांगितले. त्यामुळे ही समस्या साेडविण्यासाठी ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी माधव चर्जन व पालकांनी केली असून, मुख्याध्यापक प्रकाश आदमने यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

...

पास देण्याचे आदेश नाहीत

ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळाला विद्यार्थी बस सवलत पास वितरित करण्याचे आदेश दिले नाहीत. हे आदेश प्राप्त हाेताच पासेसच्या वितरणासह ग्रामीण भागात बससेवा सुरू केली जाणार असून, काेराेना संक्रमण टाळण्यासाठी बसमध्ये याेग्य उपाययाेजना केल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Start bus services in rural areas