स्टार बसचे ‘अच्छे दिन आ गये’

By Admin | Updated: May 30, 2014 01:06 IST2014-05-30T01:06:35+5:302014-05-30T01:06:35+5:30

सध्या सगळीकडेच ‘अच्छे दिन आ गये’चा नारा दिला जात आहे. हानारा आता जनतेसाठी चांगले दिवस येतील या अर्थाने असला तरी नागपूरकरांसाठी मात्र नेमके याऊलट झाले आहे. सेवेच्या नावावर बोंब

Star Bus's 'Good Day' | स्टार बसचे ‘अच्छे दिन आ गये’

स्टार बसचे ‘अच्छे दिन आ गये’

प्रवाशांवर भुर्दंड : तिकिटात एक ते दोन रुपयांची वाढ
नागपूर : सध्या सगळीकडेच ‘अच्छे दिन आ गये’चा नारा दिला जात आहे. हानारा आता  जनतेसाठी चांगले दिवस येतील या अर्थाने असला तरी नागपूरकरांसाठी मात्र नेमके याऊलट झाले  आहे. सेवेच्या नावावर बोंब असलेल्या स्टार बसचे भांडे  वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता  स्टार बसचे चांगले दिवस येणार असून प्रवाशांवर मात्र भूर्दंड बसणार आहे.
 स्टार बसने केलेल्या भाडेवाढीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन  अधिकार्‍यांनी मंजुरी प्रदान केली आहे. प्रवासाचा टप्पा जितका लांब त्याप्रमाणे भाड्यात एक व  दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर १ जूनपासून लागू होतील. यात ४ ते १६  कि.मी.च्या प्रवासात एक रुपयाची वाढ तर १६ ते २0 किलोमीटरच्या प्रवासाठी दोन रुपयांची वाढ  करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची सभा नुकतीच जिल्हाधिकारी  कार्यालयात अभिषेक कृष्णा यांच्यासह आयोजित करण्यात आली. या बैठकीत दर वृद्धीला मंजुरी  देण्यात आली आहे.
स्टार बस संचालक वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लि. (व्हीएनआयएल) आणि मनपा प्रशासन यांच्यात  करार झाला होता. या अंतर्गत एसटीच्या भाडे वाढीसह स्टार बसच्या किरायातही वाढ करण्याची  अट ठेवण्यात आली. मागील महिन्यात एसटीच्या किरायात वृद्धी करण्यात आली. त्यानंतर स्टार  बसकडूनही किरायात वृद्धी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. स्टार बसच्या स्थितीत  मागील एक वर्षात कुठलीही सुधारणा झाली नाही. रस्त्यांवर धावणार्‍या बसेसची संख्याही  सातत्याने कमी होत आहे. पण किरायात वृद्धी करण्याच्या प्रस्तावाला मात्र मनपा प्रशासनाने मंजुरी  दिली आहे.
 किरायात मात्र एक रुपयाची वृद्धी करण्यात आली आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत केंद्राकडून  मिळालेल्या २६0 बसेसची स्थिती विचारण्यात आली. त्यावेळी संबंधित माहिती नंतर देण्यात  येईल, असे सांगण्यात आले होते, असे आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Star Bus's 'Good Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.