स्टार बसला आज शेवटची मुदत
By Admin | Updated: July 13, 2015 02:41 IST2015-07-13T02:41:51+5:302015-07-13T02:41:51+5:30
वंश निमयाकडे प्रवासी कर म्हणून थकीत असलेल्या ७.९३ कोटी रुपये भरण्याची मुदत सोमवारी संपत आहे.

स्टार बसला आज शेवटची मुदत
नागपूर : वंश निमयाकडे प्रवासी कर म्हणून थकीत असलेल्या ७.९३ कोटी रुपये भरण्याची मुदत सोमवारी संपत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) ही रक्कम जमा न केल्यास मंगळवारपासून आरटीओ स्टार बससेवा बंद पाडणार आहे.
आरटीओने महापालिकेला तीन दिवसांत थकीत रक्कम भरण्यासंदर्भात गुरुवारी नोटीस बजावली होती. शुक्रवारी महापालिकेने वंश नियमला नोटीस बजावून सोमवारपर्यंत थकीत रक्कम भरण्यास बजावले. या मुदतीत रक्कम न भरल्यास शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही मनपाने दिला आहे. परंतु दोन दिवस उलटूनही रक्कम भरण्यात आलेली नाही. सोमवारी रक्कम भरली जाते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार वंश निमयाला ७.९३ कोटी रुपये एकदम भरणे अशक्य असल्याने त्यांनी हप्तेवारीने पैसे भरण्याची मुभा मागितली आहे. त्यानुसार सोमवारी १ कोटी ६४ लाख भरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)