स्टार बसचालकाचा हैदोस

By Admin | Updated: June 24, 2014 00:56 IST2014-06-24T00:56:33+5:302014-06-24T00:56:33+5:30

स्टार बसच्या चालकाने आज दुपारी शून्य मैल चौक मार्गावर हैदोस घालून अनेक वाहनचालकांना उडवले. यामुळे एका वृद्धासह नऊ जणांना जबर दुखापत झाली. अनेक वाहनांचीही मोडतोड झाली.

Star Bus Driver's Hedos | स्टार बसचालकाचा हैदोस

स्टार बसचालकाचा हैदोस

अनेक वाहनचालकांना उडवले : शून्य मैल मार्गावर थरार
नागपूर : स्टार बसच्या चालकाने आज दुपारी शून्य मैल चौक मार्गावर हैदोस घालून अनेक वाहनचालकांना उडवले. यामुळे एका वृद्धासह नऊ जणांना जबर दुखापत झाली. अनेक वाहनांचीही मोडतोड झाली. या अपघातामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.
दिघोरी-सीताबर्डी ही स्टार बस (एमएच ३१/ सीए ६११८) आज दुपारी मानस चौकाकडून शून्य मैलमार्गे सीताबर्डीकडे जात होती. बसचालकाने वेग कमी करण्याऐवजी बस सीताबर्डीकडे वेगात वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनियंत्रित बसने दुचाकीवरील सूरज आणि त्याचे वडील योगीराज खराबे, विवेक ठाकरे आणि अभय तांबे, तसेच अ‍ॅक्टिव्हावरील रमेश वाघाडेंना गंभीर दुखापत झाली. त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला. यानंतर अनियंत्रित बसने बोलेरोला धडक देऊन हेमंत कमलेश कटरे, वॅगनआरमधील भूपेश आणि अनिल खरवडे तसेच झायलोचा चालक अमर गौर यांना जबर जखमी केले. या अपघातामुळे घटनास्थळी एकच धावपळ निर्माण झाली. वाहनचालकांनी आपला जीव वाचविण्यासाठी इकडेतिकडे पळ काढला.
संधी साधून बसचालक आरोपी नंदकिशोर बाबूराव कावळे (वय ५४, रा़ सर्वश्रीनगर) याने मारहाणीच्या धाकामुळे पळ काढला. सीताबर्डी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले, नंतर त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Star Bus Driver's Hedos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.