शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

नागपूर शहरात ठिकठिकाणी तुंबले पाणी : नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:08 IST

नागपूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी जोराचा पाऊ स झाला. तास-तासाच्या पावसामुळे सखल भागातील वस्त्यात पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले.

ठळक मुद्देपुलाखाली तीन फूट पाणी : ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व परिसरात गुरुवारी सकाळी जोराचा पाऊ स झाला. तास-तासाच्या पावसामुळे सखल भागातील वस्त्यात पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. कपीलनगर, जोगीनगर, रामेश्वरी पार्वतनीगर, बेलतरोडी, मनिषनगर आदी भागात पाणी तुबल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. मनिषनगर पुलाखाली तसेच धंतोली रेल्वे अंडरब्रीज खाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हाळगीनगर चौकातील रस्त्यावर झाड पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. यामुळे अग्निशमन विभागाची तारांबळ उडाली होती.

कपीलनगर येथे पाणी तुंबले होती. जोगीनगर येथील प्लाट १९० व १९२ वर पाणी साचले होते. सिंमेट रोडच्या उंच बांधकामामुळे रस्त्यालगतच्या भागात पाणी साचले होते. हुडकेश्वर रोडवरील सुयोगनगर येथे पाणी साचले होते. हुडकेश्वर नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेली वाहने पाण्याखाली बुडाली होती. नरेंद्र नगर पुलासाखाली दोन ते तीन फूट पाणी साचले होते. पाण्यातच कार बंद पडली होती. एअरपोर्ट सेंटर पाईंट समोरील नवीन पुलाखाली अशीच अवस्था होती. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
कमळना मार्केट परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबले. त्यातच मेट्रो रेल्वे काम सुरु असल्याने पावसाळी नाल्या बुजल्याने मेट्रो रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचले होते. कमणना मार्केट रोडवर जागोजागी पाणी तुंबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होतो.
महापौरांनी गाठले ‘सिटी ऑपरेशन सेंटर’
गुरुवारी सकाळी जोरदार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. नरेंद्रनगर, कॉटनमार्केट व एअरपोर्ट हॉटल सेंटर पॉईंट येथील पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात गंभीर घटना तर घडली नाही ना, याची माहिती घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सकाळी १० च्या सुमारास महापालिका मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर ’गाठले. संपूर्ण शहरातील परिस्थितीची पाहणी केली.अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. अग्निशमन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडचे राजेश दुफारे उपस्थित होते. सिटी ऑपरेशन सेंटरमधून त्यांनी शहरातील सर्व झोनमधील भागांची पाहणी केली. पावसामुळे नेहमी बाधीत होत असलेल्या भागांचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान कुठेही परिस्थिती हाताबाहेर गेले नसल्याचे त्यांना आढळले.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर