शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेतून कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 23:35 IST

ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या पदांना मोठी कात्री लावली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ४५ वरून १८ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विभागाकडे महिला सक्षमीकरणाचे मोठे काम आहे. गावागावातील लाखो महिला या विभागाशी जुळलेल्या असून लाभ घेत आहेत. परंतु विभागाचा नवीन आकृतिबंध बघता सरकार विभाग बंद करतेय की काय, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

ठळक मुद्देनव्या आकृतिबंधात पदसंख्या अर्ध्यापेक्षाही कमी : केवळ १८ कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या पदांना मोठी कात्री लावली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ४५ वरून १८ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विभागाकडे महिला सक्षमीकरणाचे मोठे काम आहे. गावागावातील लाखो महिला या विभागाशी जुळलेल्या असून लाभ घेत आहेत. परंतु विभागाचा नवीन आकृतिबंध बघता सरकार विभाग बंद करतेय की काय, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांमध्ये ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना करण्यात आली. गरीब कुटुंबांना वैयक्तिक व सामूहिक योजनांमध्ये लाभ देणे, महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रशिक्षण देण्याचेही काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केले जाते. याशिवाय गरीब मागासवर्गीय लोकांसाठी घरकूल योजना तसेच ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना, पारधी लोकांसाठी पारधी आवास योजना, आदी योजना या विभागाच्या वतीने राबविण्यात येतात.या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत या विभागाला स्वतंत्र जागा देण्यात आली व त्याकरिता कर्मचारीवर्गही उपलब्ध करून दिला. या विभागाची स्थापना करण्यात आली त्यावेळी या विभागात अधिकारी, कर्मचारी मिळून ४५ जणांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मात्र या विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली. दुसरीकडे योजनांची संख्या मात्र वाढत होती. रोज एका नव्या योजनेची भर पडत आहे. असे असताना या विभागाचा नवीन आकृतिबंध जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये केवळ १८ कर्मचाऱ्यांची संख्या ठेवण्यात आली आहे. याचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होणार आहे. कर्मचाºयांच्या अपुऱ्या संख्येमुळे योजना रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अशी झाली पदांची कपातसहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची संख्या ५ वरून केवळ १ ठेवण्यात आली आहे. सहायक लेखाधिकाऱ्यांची २ पदे रिकामी करण्यात आली आहेत. विस्तार अधिकाऱ्यांच्या पदांनाही कात्री लावण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक, वाहन चालक, शिपाई यांची प्रत्येकी दोन पदे ठेवण्यात आली आहेत. उर्वरित सर्व पदांना कात्री लावण्यात आली असून एकच पद ठेवण्यात आले आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहायक, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, अधीक्षक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी यांचे प्रत्येकी एक पद नव्या आकृतिबंधात ठेवले आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरEmployeeकर्मचारी