पोलीस आयुक्तांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:16+5:302020-12-25T04:08:16+5:30
नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी काटोल मार्गावरील मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांचा जनता दरबार ...

पोलीस आयुक्तांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या
नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी काटोल मार्गावरील मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांचा जनता दरबार आयोजित केला होता. यात मुख्यालय आणि ठाण्यातून ५५० कर्मचारी सहभागी झाले. पोलीस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सुविधा, पुरस्कार, वेतनवाढ, पोलीस क्वाॅर्टर आणि सुटीशी निगडित समस्या पोलीस आयुक्तांसमोर ठेवल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील संबंधित लिपिकास बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्याचे निर्देश दिले. त्यांनी आगामी दिवसातही जनता दरबार आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
.............
सट्टा चालविणाऱ्यास अटक
नागपूर : यशोधरानगर पोलिसांनी सट्ट्याची खायवाडी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. मारुती पुनमचंद बोकडे (२५) रा. कांजी हाऊस चौक असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार ऋषभ मोटघरे (२५) रा. बारसेनगर पाचपावली हा फरार आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि दुचाकीसह ७६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने ऋषभच्या मदतीने खायवाडी केल्याचे सांगितले. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर ऋषभ फरार झाला. दोघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.............