सिमेंट रोडमुळे रखडले डांबरीकरण

By Admin | Updated: November 11, 2014 00:56 IST2014-11-11T00:56:40+5:302014-11-11T00:56:40+5:30

केडीके कॉलेज ते घाट रोड दरम्यान सिमेंट रोड बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली आहे. अशोक चौकापर्यंत सिमेंट रोडचे अर्धवट काम झाले आहे. अशोक चौक ते घाट रोडपर्यंत

Stacked tarpaulin by cement road | सिमेंट रोडमुळे रखडले डांबरीकरण

सिमेंट रोडमुळे रखडले डांबरीकरण

अशोक चौक ते घाट रोडची स्थिती दयनीय
नागपूर : केडीके कॉलेज ते घाट रोड दरम्यान सिमेंट रोड बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वीच तयार करण्यात आली आहे. अशोक चौकापर्यंत सिमेंट रोडचे अर्धवट काम झाले आहे. अशोक चौक ते घाट रोडपर्यंत रस्त्याच्या दुसऱ्या भागातील रस्ता पूर्णत: उखडला आहे. सिमेंट रोड होणार असल्याने यावरील डांबरीकरणाचे काम चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी मात्र डोळे झाकून बसले आहेत.
अशोक चौक येथून पाच मार्ग जातात. उमरेड रोड, मेडिकल चौक, बैद्यनाथ चौक, महाल आणि रेशीमबाग असे हे मार्ग आहेत. उमरेड रोड आणि मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची स्थिती चांगली आहे. येथील रस्त्यांवर काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे. अशोक चौक ते बैद्यनाथ चौक आणि बैद्यनाथ चौक ते घाट रोडची स्थिती मात्र अतिशय दयनीय आहे. आशीर्वाद टॉकीज समोरील रस्त्याची स्थितीसुद्धा दयनीय आहे. येथून जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. डांबर निघाल्याने सर्वत्र रस्त्यावरील धूळ उडत असते. येथील नागरिक जेव्हा जेव्हा डांबरीकरण करण्याची मागणी करतात तेव्हा सिमेंट रोड होत असल्याचे सांगून मनपा अधिकारी नागरिकांची बोळवण करतात. (प्रतिनिधी)
नेहमीच होतात अपघात
येथील रस्ता अतिशय दयनीय असल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालकांचा नेहमीच अपघात होत असतो. वाहनांची एकमेकांना धडक होणे, गाड्या स्लीप होणे, ही रोजचीच बाब झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत किमान ते खड्डे बुजविण्यात यावे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Stacked tarpaulin by cement road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.