भंगार विक्रीतून एसटीला मिळाले २.५७ कोटी : ४५ बसेस निघाल्या भंगारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:54 PM2021-02-25T22:54:23+5:302021-02-25T22:56:42+5:30

Buses in scrap कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात भंगार विक्रीतून २ कोटी ५७ लाख रुपये मिळाले आहेत. यात भंगार झालेल्या ४५ बसेसचाही समावेश आहे.

ST got Rs 2.57 crore from scrap sale: 45 buses in scrap | भंगार विक्रीतून एसटीला मिळाले २.५७ कोटी : ४५ बसेस निघाल्या भंगारात 

भंगार विक्रीतून एसटीला मिळाले २.५७ कोटी : ४५ बसेस निघाल्या भंगारात 

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात भंगार विक्रीतून २ कोटी ५७ लाख रुपये मिळाले आहेत. यात भंगार झालेल्या ४५ बसेसचाही समावेश आहे.

कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासही प्रशासनाकडे पैसे नव्हते. अखेर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची शिल्लक असलेली रक्कम दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य झाले. अशा स्थितीत महामंडळास भंगार झालेल्या बसेसमुळे दिलासा मिळत आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केलेल्या भंगार विक्रीत जुन्या बसेस, गाडीच्या सीट, दरवाजे आदींचा समावेश आहे. २०२० च्या अखेरीस भंगार विक्रीतून एसटीच्या नागपूर विभागाला ५० लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला होता.

नियमानुसार वर्षभरात दोन वेळा भंगाराचा लिलाव होण्याची गरज आहे. मागील वर्षाच्या अखेर लिलाव झाल्यानंतर यावर्षी झालेला हा पहिला लिलाव आहे. २०२१ मध्ये आणखी एकदा लिलाव होणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

Web Title: ST got Rs 2.57 crore from scrap sale: 45 buses in scrap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.