शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाकडून आता सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट; कार्ड रिचार्जचीही व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 01:47 IST

एसटी प्रवासाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी यापुढे हे स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार असून कार्ड मिळवण्यासाठी महामंडळाने तीन हजारांवर एजंट नियुक्त केल्याची माहिती आहे.

 

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी प्रवासाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी यापुढे हे स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार असून कार्ड मिळवण्यासाठी महामंडळाने तीन हजारांवर एजंट नियुक्त केल्याची माहिती आहे.रोख व्यवहारांच्या चौकटीपलीकडे जाऊन पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ही प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही बाबी एका स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एकत्रित केल्या जाणार असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. ही योजना पूर्ण करण्यासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. त्यानुसार, राज्यातील सर्व आगारांमध्ये या कार्डसाठी नोंदणी सुरू केली जाणार आहे. एनसीएमसी कार्ड १९९ रुपयांत दिले जाणार असून जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड दिले जाईल. याची वॉलेट मर्यादा किमान १०० रुपये ते कमाल ५०० रुपये इतकी ठेवता येईल. शिवाय आवश्यकतेनुसार ५० रुपयांच्या पटीत कार्ड रिचार्ज करता येणार आहे. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटच्या माध्यमातून हे कार्ड रिचार्ज करता येईल.

एनसीएमसी कार्ड कुणासाठी? -या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी संलग्न कार्ड दिले जाणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना आधारसंलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य संग्राम सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयातील मुख्यालयामार्फत या कार्डचे वितरण केले जाणार आहे.बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया -ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी महामंडळाकडून राज्यभरात ३००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, महामंडळाने यापूर्वी सवलतीधारक प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती. मात्र, काही महिन्यातच या योजनेचा बोजवारा उडाला.आणखी तीन महिने प्रतिक्षा -या संबंधाने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एसटीचे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी ही योजना सुरू व्हायला आणखी दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागेल, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : ST Corporation Introduces NCMC Smart Card Recharge for Concession Holders

Web Summary : ST Corporation introduces NCMC smart cards for concession holders, replacing old cards. Registration starts at all depots with appointed agents. The card costs ₹199, ₹149 for replacements, and can be recharged via multiple channels, simplifying fare payments. The new system is expected to take three months to fully implement.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र