शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’मार्गे एसटी बस ‘साईंच्या दारी’; १५ डिसेंबरपासून विशेष सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 07:05 IST

रविवारी या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर या मार्गाचा वापरही सुरू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर धावण्यासाठी एसटी बस सज्ज आहे. गुरुवारी १५ डिसेंबरपासून एसटीची विशेष प्रवासी बस ‘समृद्धी’मार्गे रोज नागपूरहून शिर्डीला जाणार आहे.  

रविवारी या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानंतर या मार्गाचा वापरही सुरू झाला. खासगी प्रवासी बसच्या संचालकांना तर या महामार्गामुळे वेगळाच आनंद झाला आहे. कारण जेथे ७ ते ९ तास लागायचे ते नागपूर-शिर्डी अंतर केवळ ५ तासांत पूर्ण होणार आहे. त्यांचे तीन तासांचे डिझेल अन् त्यापोटी होणारा हजारोंचा खर्च आता कमी होईल, अर्थात हा खर्च नफा म्हणून ट्रॅव्हल्स संचालकांच्या खिशात जमा होणार आहे. वेळ वाचणार म्हणून प्रवासीही ट्रॅव्हल्सकडे धाव घेणार आहे. हा एकूणच सगळा जमा खर्च अन् लाभ लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानेही आपली बससेवा या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गणेशपेठ बसस्थानकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती शिर्डीत दाखल होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतून एक बस निघेल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.  

येथेही सवलत मिळेलबसचे प्रवासभाडे १३०० रुपये आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशाला मोफत प्रवासाची सवलत मिळेल, तर ६५पेक्षा जास्त वय असलेल्यांना अर्धेच तिकिट लागेल. 

आरामदायक प्रवास एसटीची ही बस आरामदायक, स्लिपरकोच असणार आहे. अर्थात जेवण करून रात्री बसमध्ये बसले की छान झोप घेऊन प्रवाशांना भल्या सकाळी शिर्डीत पोहोचता येईल. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गshirdiशिर्डीstate transportएसटी