शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपुरात कॅन्डल मार्च काढून श्रीलंका हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:30 PM

श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देसंघर्ष वाहिनी व सर्वधर्मीय-सर्वपक्षीय आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीलंका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी संघर्ष वाहिनीच्यावतीने मंगळवारी कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.रविवारी दहशतवादी संघटनेतर्फे सुसाईड बॉम्बरचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणी आत्मघाती साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते, ज्यामध्ये ३०० च्या जवळपास निरपराध नागरिक प्राणास मुकले. या घटनेचा जगभरातून निषेध नोंदविला जात आहे. भारतातही या हल्ल्याची हळहळ व्यक्त केली जात असून समाजमन सुन्न झाले आहे. मंगळवारी शहरात संघर्ष वाहिनीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे गोळा होऊन सुरुवातीला मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर संविधान चौक ते झिरो मॉईल चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदविला. यामध्ये दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, गणेश धुले, धर्मपाल शेंडे, शंकरराव फुंड, विनोद आकुलवार, लक्ष्मण पोटे, रामाजी जोगराणा आदी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होते. यादरम्यान सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांतर्फे श्रीलंका येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्लम सॉकरचे संस्थापक प्रा. विजय बारसे यांच्या नेतृत्वात रेव्ह. अमित शिंदे, जॉन थॉमस, सुभाष पाटील, विल्सन पाटील, लिओ पीटर, क्लॉडियस पीटर, चॉर्ल्स फ्रान्सिस, आस्मी फ्रान्सिस, स्पेन्सर जॉन, अ‍ॅम्ब्रोस मायकल, मायकल जॉन, जुलियट जॉन, संजीव फ्रान्सिस आदी उपस्थित होते. शोकसभेनंतर सर्व नागरिक संघर्ष वाहिनीतर्फे काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाBlastस्फोटMorchaमोर्चा