शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:07 IST

शहरातील मोकाट श्वानांच्या संख्ेयला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी पकडायला येत असल्याची जाणीव श्वानांना होते. त्यामुळे पथक दिसले की, ते श्वान धूम ठोकतात. नसबंदीसाठी मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देनऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी : रेल्वे स्टेशन परिसरातील श्वानांवर नसबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी पकडायला येत असल्याची जाणीव श्वानांना होते. त्यामुळे पथक दिसले की, ते श्वान धूम ठोकतात. नसबंदीसाठी मोकाट श्वानांना पकडण्यासाठी पथकाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.१४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोकाट श्वानांना पकडून त्यांचे लसीकरण व नसबंदी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेस्थानक परिसरातील श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यानंतर विमानतळ, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मोकाट श्वानांवर नसबंदी केली जाणार आहे. सातारा येथील वेट फॉर अ‍ॅनिमल या गैरसरकारी संस्थ्ंोला हे काम देण्यात आले आहे. याकामी दहा कर्मचारी व दोन डॉक्टर आहेत.कर्मचाऱ्यांच्या हातात जाळ्या दिसल्या की श्वान वाट्टेल त्या मार्गाने पळताना दिसतात. ‘वेट फॉर अ‍ॅनिमल’ ही संस्था केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाशी संलग्नित आहे. महाराजबागसमोरील रुग्णालयात प्रति दिवस ४० मोकाट श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही संस्था प्रारंभी २० ते २५ मोकाट श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरण करणार आहे. यासाठी संस्थेला प्रति श्वान ७०० रुपये दिले जात आहेत. नसबंदी केल्यानंतर व लसीकरण झाल्यानंतर मोकाट श्वानांना महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विद्यापीठाच्या रुग्णालयात तीन दिवस ठेवण्यात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ जागी आणून सोडले जात असल्याची माहिती महापालिकेचे पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.शहरात सध्या ९० हजारांवर मोकाट श्वान असल्याचा अंदाज आहे. ऑगस्ट २००६ मध्ये पहिल्यांदा चार संस्थांना नसबंदी शस्त्रक्रिया व अ‍ॅन्टीरॅबीज लसीकरण राबविण्यात आले होते. २०१० पर्यंत हा कार्यक्रम चालला. त्यानंतर २०११ व २०१७ मध्येही ही मोहीम राबविण्यात आली होती. २०१४ पासून गेल्या वर्षी २०१९ पर्यंत एकूण १० हजार ५४६ मोकाट श्वानांवर नसबंदी करण्यात आली. त्यावर ५५ लाख ७९ हजार ५९३ रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१६-१७ मध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. २०१८ मध्ये स्थायी समितीने या प्रस्तावास मंजुरी प्रदान केली होती. जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी मोकाट श्वानांच्या तक्र्रारी केल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हा कार्यक्रम सुरू केला.सोनेगाव केंद्र लवकरच सुरू होणारमहापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये मोकाट श्वानांवर नसबंदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातील एक केंद्र सुरू झाले आहे. सोनेगाव परिसरात पुन्हा एक केंद्र उभारण्यात आलेले आहे. ते लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :dogकुत्राNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका