नागपुरात ‘ऑन दी स्पॉट’ रॅपिड अँटिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:08+5:302021-04-18T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या वतीने शनिवारी नागपुरात विविध भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट ...

On-the-spot rapid antigen test in Nagpur | नागपुरात ‘ऑन दी स्पॉट’ रॅपिड अँटिजेन टेस्ट

नागपुरात ‘ऑन दी स्पॉट’ रॅपिड अँटिजेन टेस्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या वतीने शनिवारी नागपुरात विविध भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू करण्यात आली. परिमंडळ २ मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत २१ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यातील ५ जन पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे त्यांना तेथूनच क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

कोरोनामुळे नागपुरातील स्थिती भयावह झाली आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित वाढल्यामुळे त्यांना सरकारी अथवा खासगी रुग्णालयात बेड मिळेनासे झाले आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन आणि इतर औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळावा म्हणून कोरोना बाधितांच्या नातेवाइकांची अक्षरशः फरफट सुरू आहे. औषध उपचार मिळेनासे झाल्यामुळे अनेकांचे जीव जात आहे. अशाही स्थितीत अनेक बेशिस्त नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरून, गर्दी करून कोरोनाचा धोका वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारपासून नागपुरातील विविध भागांत चक्क रस्त्यावरच रॅपिड अँटिजेन टेस्टची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. अनामिक कारणामुळे शहरातील पाचपैकी परिमंडळ २ मध्येच ही मोहीम शनिवारी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. सीताबर्डी, सदर, अंबाझरी आणि गिट्टीखदान परिसरात सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत दुपारी २ वाजेपर्यंत २१ वाहनचालकांची टेस्ट करण्यात आली. त्यात पाच वाहनचालक कोरोनाबाधित आढळले. त्यांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्यांना तेथूनच सरकारी वाहनाने क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्या नातेवाइकांनी तसा निरोप देण्यात आला.

----

अनेकांनी काढला पळ

या मोहिमेचे व्हिडिओ आणि फोटो शहरात व्हायरल झाल्याने रिकामटेकड्यांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. रिकामटेकड्यांनी या मोहिमेचा धसका घेतल्यामुळे दुपारी २ वाजतानंतर शहरातील अनेक मार्गांवर नेहमीसारखी वर्दळ दिसून येत नव्हती. टेस्ट सुरू असल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी मागच्या मागे पळ काढला.

Web Title: On-the-spot rapid antigen test in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.