पुण्यातील क्रीडा विद्यापीठ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 22:02 IST2021-08-30T22:01:53+5:302021-08-30T22:02:22+5:30
Nagpur News राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडाविद्यापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

पुण्यातील क्रीडा विद्यापीठ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील खेळाडू व मार्गदर्शक घडविण्यासाठी पुणे येथील क्रीडाविद्यापीठ येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. (Sports University in Pune will be operational from October)
या वेळी जिल्हाधिकारी विमला आर., शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त गणेश कोहळे, उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम उपस्थित होते.
या वेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत, दिव्यांग खेळाडू क्रिकेट क्रीडा प्रकारातील मृणाली पांडे, दिव्यांग बुद्धिबळ खेळाडू मालविका बनसोड, बॅडमिंटन खेळाडू दीपिका ठक्कर, अल्फिया पठाण, रौनक साधवाणी, जलतरणपटू जयंत दुबळे, बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता, जिम्नॅस्टिक मृणयी वालदे, आयुषी घोडेस्वार, योगपटू धनश्री लेकुरवाळे या खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कुस्तीपटूंना सरावाकरिता कुस्तीमॅट तसेच बॉक्सिंगसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्फिया पठाणला प्रॅक्टिस मॅटचे वितरण करण्यात आले.