फॅशनच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:08 IST2021-01-21T04:08:34+5:302021-01-21T04:08:34+5:30

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अभिनेता पवन शंकर, दिव्या भगत, सुषमा अग्रवाल, शुभांगिनी नरसे, सविता तुरकर, समिग्ध पुरोहित, सविता अग्रवाल, अमिता ...

Spontaneous response to fashion show | फॅशनच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फॅशनच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अभिनेता पवन शंकर, दिव्या भगत, सुषमा अग्रवाल, शुभांगिनी नरसे, सविता तुरकर, समिग्ध पुरोहित, सविता अग्रवाल, अमिता वढेरा, बरखा कनोजिया, पिंकी भईदानी व मनीषा अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. हे प्रदर्शन १९ व २० जानेवारी रोजी हॉटेल ग्रॅण्ड सीता येथे पार पडले. प्रदर्शनात निःशुल्क प्रवेश होता. मुंबई, दिल्ली, चंदीगड, जयपूर, इंदूर, रायपूर, अमृतसर, लखनौ, कानपूर आदी शहरातील प्रसिद्ध डिझायनर्सनी वस्त्र, दागिने, वेस्टर्न वेअर, घर सजावटीच्या वस्तू, फुटवेअर आदीचे सर्वोत्कृष्ट कलेक्शन प्रदर्शनामध्ये सादर केले होते. फॅशनिस्टा व फॅशनव्याचे महाव्यवस्थापक अखिलेश पांडेय यांनी सांगितले की, फॅशनिस्टा कंपनीच्यावतीने २००८ पासून ३६ शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले जात आहे. आतापर्यंत २५० वर प्रदर्शने झाली आहेत. कंपनीला उत्कृष्ट फॅशन कंपनीचा पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Spontaneous response to fashion show