चार ठिकाणी पार पडल्या स्पर्धा : लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे आयोजननागपूर : गेली दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंद, उत्साहाचे वातावरण होते. या उत्साहाला द्विगुणीत करण्यासाठी लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे बाप्पा मोरया... या स्पर्धेचे आयोजन शहरातील चार ठिकाणी करण्यात आले होते. स्पर्धेला सखींचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला होता. लोकमत भवनाच्या ११ व्या माळ्यावरील सभागृहात स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. कुसुमताई बोदड प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शहरातील खामला, मानेवाडा, लोकमत चौक व बोरगाव या ठिकाणी बाप्पा मोरया स्पर्धा घेण्यात आली होती. यात मोदक स्पर्धा, गणेश रेखाटन स्पर्धा व पुष्पहार स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेला परीक्षक म्हणून इंदूताई पुंड, साधना बरडे, सुनीता अडकीने, सरोज चव्हाण, नीलिमा कोटेचा, वर्षा चौधरी, कल्पना तडस, रश्मी तलमले, रंजना पांडेय, पूर्णिमा राऊत, अर्चना चिलवरवार, सुजाता नागपुरे, माया सावरकर यांनी काम पाहिले. स्पर्धेला विशेष सहकार्य मनोज तलमले व रेखा निल यांचे लाभले. (प्रतिनिधी)घरगुती गणेश सजावट स्पर्धेत शिवहरे प्रथमगेल्या काही वर्षात शहरात गणेश उत्सवाची भव्यता वाढली आहे. घराघरात गणपतीची स्थापना करून दहा दिवस हा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येतो. गणपतीच्या स्थापनेसाठी आकर्षक सजावट करण्यात येते. काही भाविक या उत्सवाला सामाजिक विषयाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. अशा भाविकांसाठी लोकमत सखी मंचने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी केलेल्या सजावटीची दखल घेऊन, त्यांना रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गणेश सजावट स्पर्धेचे पहिले बक्षीस शंकर शिवहरे यांनी पटकाविले. त्यांना ३००0 रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक नीतु पारेख यांनी पटकाविले. त्यांना २००0 रुपये रोख, तृतीय पारितोषिक राजेश अंड्रसकर यांनी पटकाविले त्यांना १००0 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिक शेखर भडे व प्रदीप साठे यांना प्रदान करण्यात आले.
बाप्पा मोरया स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST