शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कामशिल्पांचे आध्यात्मिक तत्त्व संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:57 IST

आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत.

ठळक मुद्देवि. सा. संघातर्फे चर्चात्मक कार्यक्रम‘मंदिरावरील कामशिल्प’वर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद््भूत मिलाफ या मंदिराच्या कामशिल्पातून होतो. संसारातून वैराग्याकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करताना मधले दैनंदिन कामकर्तव्य महत्त्वाची असतात. मात्र त्यातील कामभावनेकडे अधिक लक्ष देण्यात आले. त्यातील आध्यात्मिक तत्त्व आपल्यापर्यंत पोहचलीच नाही. ती त्या रूपाने संशोधन करून पोहचणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सर्जना निर्माण या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मंदिरावरील कामशिल्पे’या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी चन्ने यांनी कोणार्क मंदिरावर विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कामशिल्पे असलेली मंदिरे मध्य भारताच्या खाली बनविल्या गेली. कोणार्कच्या सूर्यमंदिराची निर्मिती त्याकाळच्या राजाने केली. त्यातील सूर्यदेवाच्या रथाची चाके, या चक्रातील २४ रेषा, ८ आरे यांना गहन अर्थ आहे. त्याच्यामध्ये कामशिल्पे कोरली आहेत. यात शयनाची वेगवेगळी आसने आहेत. शयन किंवा मिथूनाला वेळेचे बंधन नसते, कुठल्याही मानसिकतेत ते होते, इतर सर्व भेदापेक्षा स्त्री-पुरुष हाच भेद महत्त्वाचा असतो. प्रत्येक शिल्प प्रतिकांच्या रूपात समोर येतात. वात्यायनाच्या कामासनावर आधारित ही शिल्पे अद््भूत सौंदर्याने व त्यामागील अर्थाने भरलेली आहेत. ती संवेदना समजली नाही तर भावनांचा घोळ होतो; म्हणून त्याचा अभ्यास करा, ती संवेदना जपा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ. रमा गोळवलकर यांनी खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिराची विशेषता सांगितली. कर्कवृत्ताच्या रेषेवर बांधलेले हे मंदिर ओलांडून सूर्यही जात नाही, यामागील खगोलशास्त्र त्यांनी उलगडून सांगितले. मंदिराचे बांधकाम वेगवेगळ्या स्तरात झाले आहे. कलश, शिखर, मंडोवर किंवा जंघा तसेच अधिष्ठान किंवा जगती असे स्तर आहेत. त्यातील जगती भागावर केवळ ३ टक्के कामशिल्पे आहेत. या कामशिल्पामध्ये संगीत, नाटक, नृत्य, शेतीची कामे व कामक्र ीडेपर्यंतच्या दैनंदिन कामांचे शिल्प कोरलेली आहेत. पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये कामभावनेचाही समावेश आहे. ही कामशिल्पे मंदिराच्या बाह्य भागात जगतीवर केवळ १० ते १२ इंच मोठी आहेत. दैनंदिन कामभावना बाहेर सोडून या कामशिल्पामधील आसक्ती, तन्मयता ईश्वराबद्दल असेल तरच तुम्ही मंदिराच्या आत गाभाºयात प्रवेश करा, असा आध्यात्मिक संदेश या शिल्पांच्या माध्यमातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम माधव धोंड यांनी मंदिरावरील कामशिल्पामधील काव्यभावना उलगडून सांगितली. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

टॅग्स :Templeमंदिर