लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनीमार्फतच उत्पादन व थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्मातर्फे शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. नवीन संशोधित वाण असल्यामुळे पहिल्याच वर्षी या वाणाला जनतेकडून मागणी मिळविण्यासाठी धान्य महोत्सवात खुले करण्यात आले. संपूर्ण सेंद्र्रीय पद्धतीने भाताचे उत्पादन घेतल्याने सरासरी उत्पादनही बऱ्या प्रमाणात झाले. प्रायोगिक पध्दतीने २० हेक्टरवर १३६० क्विंटल धान उत्पादन झाले. धान्य महोत्सवात सरासरी ७० रुपये किलोप्रमाणे या तांदळाला भाव मिळाला. त्यामुळे हे नवीन वाण जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रारंभी धानाचे प्रयोगशाळेत पाठवून उगवणूक क्षमता तसेच आवश्यक गुणधर्म तपासण्यात आले. जिल्ह्यातील मौदा, उमरेड, कुही, रामटेक, पारशिवनी आदी भात उत्पादक क्षेत्रात रोवणीसाठी हे धान उपलब्ध करुन देण्यात आले. शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी तथा गट स्थापन करुन पार्वतीसुत या नवीन संशोधित वाणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.चंद्रपूरच्या शेतकऱ्यांने विकसित केले वाणहलका सुगंधित व बारीक असलेले पार्वतीसुत हे धानाचे नवीन संशोधन चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदीचे प्रगतिशील शेतकरी सुधाकर पोशेट्टीवार यांनी संशोधित केले आहे. धान पिकामध्ये संशोधन करुन पार्वतीसुत हे वाण तयार झाल्यानंतर या संशोधित वाणाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांना कमी दिवसात व सरासरी जास्त उत्पादन देणारे हे वाण असल्यामुळे आत्मातर्फे शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर उत्पादनाला सुरुवात केली.
धानाच्या नवीन संशोधित वाणाला आत्माचे प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:08 IST
आकाराने लहान असूनही सुगंधित असलेल्या पार्वतीसुत-२७ या धानाच्या नवीन संशोधित वाणाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेने प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यातील सरासरी २०० एकरामध्ये भात रोवणीला प्रोत्साहन मिळाले आहे. पार्वतीसुत-२७ हे १२५ दिवसात उत्पादन देणारे तसेच आकाराने लहान असून सुगंधित असल्यामुळे हे तांदळाचे संशोधित वाण नुकत्याच झालेल्या धान्य महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. मागील वर्षी १७० एकरामध्ये या संशोधित वाणाची प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून पीक घेतले होते. शेतकऱ्यांना या संशोधित वाणापासून सरासरी हेक्टरी २० क्विंटल धान झाले असून हे वाण जिल्ह्यातील इतर कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासाठी आत्माने पुढाकार घेतले असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले.
धानाच्या नवीन संशोधित वाणाला आत्माचे प्रोत्साहन
ठळक मुद्देपार्वतीसुत सुगंधित व लहान तांदळाचे वाण : प्रायोगिक तत्त्वावर २०० एकरात भाताची रोवणी