शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकची धडक : एका महिलेचा मृत्यू, १३ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:55 IST

धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देनागपुरातील लकडगंज परिसरात भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या जैन भाविकांच्या प्रवासी बसला ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून जोरदार धडक मारली. यामुळे बसमधील एक महिला भाविक ठार झाली तर, १३ प्रवासी भाविक जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी दोषी ट्रकचालक दिलीप चौधरी (रा. कारंजा घाडगे) याला अटक केली आहे. 

आलोक मुनी महाराज यांच्या चातुर्मास प्रवेश शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी स्थानिक जैन बांधव खासगी प्रवासी बसने वणीकडे निघाले होते. वर्धमाननगरातून (सेंट्रल एव्हेन्यू) टेलिफोन एक्स्चेंज चौकात बस आली असता अतिशय वेगात आलेल्या ट्रक ( एमएच ३१/ एपी ४८८६) ने बसला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की स्फोटासारखा मोठा आवाज झाला. बसमधील सर्वच्या सर्व प्रवाशांना दुखापत झाली. त्यातील १३ प्रवासी भाविक जबर जखमी झाले.  

पहाटे मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील मंडळी मोठ्या संख्येत तिकडे धावली. त्यांनी जखमींना मदतीचा हात देऊन बसबाहेर काढले. कमी प्रमाणात दुखापत झालेल्यांनी लगेच आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना फोन करून अपघाताची माहिती दिली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून लकडगंज पोलिसांनाही अपघाताचे वृत्त कळले. त्यामुळे पोलिसांसह अनेक जैन बांधव मदतीसाठी तिकडे धावले. त्यांनी जखमींना खासगी इस्पितळात दाखल केले. लकडगंज पोलिसांनी आरोपी ट्रकचालक दिलीप चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

डॉक्टरांची तत्परताया भीषण अपघाताची माहिती कळताच जैन समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलकडे धाव घेतली. डॉ. आनंद संचेती, डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. निशित मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी कमालीची तत्परता दाखवली.  वृद्ध विमलादेवी नाहटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या वाचू शकल्या नाही. उपरोक्त जखमींवर तातडीचे उपचार करण्यात आले. जखमींपैकी चारजण  अतिदक्षता विभागात आहेत. मात्र, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे संबंधितांनी लोकमतला सांगितले. मोठा अनर्थ टळलाबसचालकाच्या बाजूला जतन मालू बसून होते. त्यांनी बसकडे बेदरकारणपणे ट्रक  येत असल्याचे पाहून धोका ओळखला. त्यांनी लगेच चालकाला बसची गती वाढवण्यास सांगितले. त्यानुसार बसचालकाने बसचा वेग वाढवून चौकातून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकची गती एवढी जास्त होती की बसच्या मागच्या भागाला ट्रकने जोरदार धडक मारली. बसचालकाने तत्परता दाखवली नसती आणि धडक बसच्या मधल्या भागात बसली असती तर मोठा अनर्थ झाला होता. मालू आणि बसचालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणारा आरोपी  ट्रकचालक दिलीप चौधरी (रा. कारंजा घाडगे) याला बसचालकानेच पकडून ठेवले. त्याला नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. लकडगंज पोलिसांनी त्याला अटक केली. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू