लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चहा-नाश्ता करून घराकडे परत जाताना विद्यार्थ्याच्या भरधाव पल्सरचे संतुलन बिघडल्यामुळे ती झाडावर आदळली. त्यामुळे एकाचा करुण अंत झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हिंगणा टी-पॉईंटजवळ सोमवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. मृताचे नाव अमन अशोक नवघरे (वय २०, रा. पोलीसनगर, हिंगणा) आहे तर, कीर्तीमान डी रामरतना असे जखमीचे नाव आहे.अमन आणि कीर्तीमान हिंगणा परिसरातील प्रियदर्शनी महाविद्यालयात शिकत होते. अमन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होय. पोलिसांच्या माहितीनुसार, तो मूळचा चंद्रपूरचा रहिवासी आहे. मात्र, त्याचे आई-वडील शासकीय नोकरीच्या निमित्ताने नऊ वर्षांपासून अमरावतीला राहतात. अमन त्याच्या मित्रांसोबत हिंगण्याच्या पोलीसनगरात भाड्याच्या खोलीत राहत होता. सोमवारी रात्री अभ्यास आटोपल्यानंतर तीन-चार दुचाकींवर अनेक मित्र चहा-नाश्ता करण्यासाठी आयटी पार्ककडे आले. तेथे चहा-नाश्ता घेतल्यानंतर पहाटे ३ च्या सुमारास सर्व मित्र आपापल्या दुचाकींनी रूमकडे निघाले. अमन पल्सर (एमएच २७/ सीएम ५२३४) चालवीत होता, तर मागे कीर्तीमान बसला होता. दुचाकीचा वेग जास्त होता. हिंगणा टी-पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पल्सर सरळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. त्यामुळे अमन आणि कीर्तीमान दोघेही गंभीर जखमी झाले. सोबत जात असलेल्या अन्य मित्रांनी या दोघांना त्यांनाउपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी अमनला मृत घोषित केले.पालकांचा आक्रोशसोबत असलेल्या मित्रांनी या अपघाताची माहिती अमन आणि कीर्तीमानच्या पालकांना कळविली. त्यामुळे ते सकाळीच येथे पोहचले. दिवाळीच्या सुट्या संपल्या आणि सोमवारी कॉलेज सुरू झाल्यामुळे अनेक विद्यार्थी रविवारीच आपापल्या गावावरून परतले होते. अमनही काही तासांपूर्वीच घरून नागपुरात परत आला होता. दुसऱ्याच दिवशी त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता कुटुंबीयांना कळाली. त्यामुळे त्यांचा एकच आक्रोश सुरू होता. तो अनेकांना अस्वस्थ करणारा होता. दरम्यान, ऋषभ दिलीप चामाटे (वय २१, रा. धनगरपुरा, हिंगणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगरचे सहायक पोलीस निरीक्षक पेठे यांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
नागपुरात भरधाव पल्सर झाडावर आदळली, विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 22:27 IST
चहा-नाश्ता करून घराकडे परत जाताना विद्यार्थ्याच्या भरधाव पल्सरचे संतुलन बिघडल्यामुळे ती झाडावर आदळली. त्यामुळे एकाचा करुण अंत झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हिंगणा टी-पॉईंटजवळ सोमवारी दुपारी हा भीषण अपघात घडला.
नागपुरात भरधाव पल्सर झाडावर आदळली, विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
ठळक मुद्देसहकारी गंभीर जखमी : हिंगणा मार्गावर झाला अपघात