शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

भरधाव कार कंटेनरवर आदळली : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 22:14 IST

भरधाव कारवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला आणि कारने पादचाऱ्यास धडक दिली. त्यानंतर ती कार दुभाजक ओलांडून कंटेनरच्या मागच्या भागावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जलपूर महामार्गावरील बांद्रा शिवारात शनिवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बांद्रा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार ): भरधाव कारवरील मद्यधुंद चालकाचा ताबा सुटला आणि कारने पादचाऱ्यास धडक दिली. त्यानंतर ती कार दुभाजक ओलांडून कंटेनरच्या मागच्या भागावर आदळली. यात दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जलपूर महामार्गावरील बांद्रा शिवारात शनिवारी सायंकाळी घडली.राजकुमार मानसिंग भलावी (४५, रा. बांद्रा, ता. रामटेक) व लक्ष्मण मंगलानी (३५, रा. कामठी) अशी मृतांची तर बंटी हड्डिका (३०), प्रीतेश शर्मा (३०) व राहुल पारवानी (३०) तिघेही रा. कामठी अशी जखमींची नावे आहेत. राजकुमार भलावी हा वडांबाहून बांद्राकडे पायी येत येता. बांद्रा शिवारातील वळणावर मागून वेगात येणाऱ्या एमएच-०२/सीडब्ल्यू-१६२० क्रमांकाच्या कारने त्याला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याला धडक देताच कारचालकाचा ताबा सुटला आणि ती कार दुभाजकावर आदळून पलीकडच्या मार्गालगत उभ्या असलेल्या आरजे-१४/जीएच-१५१० क्रमांकाच्या कंटेनरवर मागून धडकली. त्यामुळे कारमधील लक्ष्मण, बंटी, प्रीतेश व राहुल यांना गंभीर दुखापत झाली. यात लक्ष्मणचा काही वेळातच मृत्यू झाला. तिन्ही जखमींवर देवलापार येथील ग्रामीण रुग्णलयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नागपूरला हलविण्यात आले. धडक एवढी जबर होती की कारचा दर्शनी भाग अक्षरश: चक्काचूर झाला. कारचालकासह अन्य तिघे दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू