शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव बसची स्कूल बसला धडक : भीषण अपघात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 20:33 IST

सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते.

ठळक मुद्देचालक जखमी, आरोपी बसचालक पळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते. त्यामुळे भीषण अपघात टळला. गुरुवारी सकाळी ६.१५ ला वर्धा मार्गावरील छत्रपती चौकाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर आरोपी बसचालक पळून गेला.स्कूल ऑफ स्कॉलरची बस (एमएच ४०/ एन ६७४७) ही गुरुवारी सकाळी ६.१५ वाजता खामल्याकडून नरेंद्रनगरकडे जात होती. छत्रपती चौकात बस आली असता, वेगात आलेल्या एका खासगी प्रवासी बसच्या (एमएच ४०/ एटी ०१६९) चालकाने स्कूल बसला जोरदार धडक मारली. धडक मारणाºया बसचा वेग एवढा जास्त होता की स्कूल बस अक्षरश: उलटी झाली. भल्या सकाळची वेळ असल्याने या मार्गावर वाहनांची किंवा नागरिकांची वर्दळ नव्हती. त्यात स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. त्यामुळे भीषण अपघात टळला. स्कूल बसचे चालक कमलाकर आनंदराव काळबांडे (वय २८, रा. नरखेड) यांना जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती कळाल्यानंतर पीएसआय मंगेश गोळे आणि धंतोलीचे पोलीस तेथे पोहचले. वाहतूक शाखेचेही पोलीस पोहचले. क्रेनच्या सहाय्याने बस सरळ करून या मार्गावर वाहतुकीला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला.या अपघातानंतर आरोपी चालक बस(ट्रॅव्हल्स)सह पळून गेला. काळबांडे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर