शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नागपुरात आता ‘स्पीडगन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:40 AM

बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देबेशिस्त वाहनचालकांना आवरणार वाहतूूक शाखेच्या उपायुक्तांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी जास्तीत जास्त स्पीडगनचा वापर करण्यात येईल. त्या माध्यमातून जीवघेणे अपघात थांबण्यासोबतच शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला. शहराला अपघातमुक्त कसे करता येईल आणि बेशिस्त वाहनचालकांना कसे वठणीवर आणता येईल, या संबंधाने त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा केली. ज्या भागात जास्त गंभीर अपघात होतात. असे ठिकाणं ब्लॅक स्पॉट म्हणून आम्ही अधोरेखित केले आहेत. अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना केल्या जात आहे, असे ते म्हणाले.उपराजधानीतील वाहतूक व्यवस्था वळणदार बनविण्यासाठी वर्षभरापूर्वी वाहतूक पोलिसांनी एन ट्रॅक्स (नागपूर ट्रॅफिक क्लब) ची निर्मिती केली. यात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील ३० ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक ग्रुप बनविला. या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपचा क्रमांक ९०११३८७१०० आहे. या क्रमांकावर आपले नाव, पत्ता पाठवून कोणताही नागरिक ट्रॅफिक क्लबचा सदस्य होऊ शकतो. जुलै २०१७ पासून या क्लबचे एकूण १५७५ सदस्य झाले. त्यांच्यापैकी अनेक सदस्यांनी उपराजधानीतील विविध भागात वाहनचालकांकडून वाहतूक नियमाचे केले जाणारे उल्लंघन आणि तशाच संबंधित एकूण ६०३ तक्रारी पाठवल्या. त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचेही उपायुक्त चैतन्य यांनी सांगितले. मेट्रो आणि सिमेंट रोड बांधकामामुळे वाहतुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतूक, मोकाट जनावरे, अतिक्रमण आणि अशाच प्रकारच्या अनेक समस्या आहेत. त्यावर प्रभावीपणे उपाय केले जातील, असे ते म्हणाले.मेट्रोने केले ४२ सिग्नल बंदमेट्रोच्या कामामुळे शहरातील ४२ सिग्नल बंद स्थितीत आहेत. पार्किंगचीही जागोजागी समस्या आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा सुरू आहे, असे उपायुक्त चैतन्य म्हणाले. शहराला अपघातमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी एनट्रॅक्सचे सदस्य व्हावे. सदस्य झालेली मंडळी आपल्या मोबाईलवरून कोणत्याही भागातील वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो आम्हाला पाठवू शकतात. आम्ही त्यावर तातडीने कारवाई करू, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

घेणे-देणे सहन करणार नाहीवाहतूक शाखा पोलिसांची कार्यपद्धती आणि लाचखोरीवर पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अवैध प्रवासी वाहतुकीचाही प्रश्न उपस्थित झाला. त्यासंबंधाने बोलताना कोणतेही लागेबांधे सहन केले जाणार नाही. भ्रष्टाचार संपवण्यासाठी कॅशलेस चालानचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचेही उपायुक्त चैतन्य म्हणाले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस