शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

बांधकामाला वेग; त्यानंतरही सिमेंट आणि स्टीलचे भाव स्थिर

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 6, 2024 21:58 IST

- बांधकाम क्षेत्रात भाववाढ नाही : दोन वर्षांत स्टीलचे भाव २० रुपयांनी घसरले

नागपूर: दरवर्षी उन्हाळ्यात बांधकामाचा वेग वाढताच सिमेंट आणि स्टीलचे भाव वाढतात, असा बिल्डरांचा अनुभव आहे. पण यंदा सिमेंटचे भाव स्थिर असून स्टीलचे भाव उतरले आहेत. दोन महिन्यांच्या तुलनेत प्रति किलो ५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. बाजारात ८ ते २५ एमएम स्टीलचे (सळाख) भाव १८ टक्के जीएसटीसह ५५ ते ५७ रुपये किलो आहेत. दोन वर्षांच्या तुलनेत स्टीलचे भाव प्रति किलो २० रुपयांनी कमी झाले आहेत. दरकपातीचा ग्राहकांचा फायदा होत आहे.सिमेंटचे भाव प्रति बॅग ३३० ते ३४० रुपये, तर रेती ५५ ते ६० रुपये फूट विकली जात आहे. डम्परचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने बांधकाम खर्च वाढला आहे. तर विटांचे भाव स्थिर आहेत. मागणी कमी असल्याने भाव बदलेले नाहीत. विटांचे उत्पादन करणाऱ्यांना कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, पुढील हंगामात स्थिती बदलणार असून सध्या मातीच्या एक हजार विटांसाठी ७००० ते ७५०० रुपये मोजावे लागत आहेत.

बांधकामाच्या खर्चावर नियंत्रणक्रेडाई नागपूर मेट्राेचे पदाधिकारी म्हणाले, गेल्यावर्षी बांधकामाला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने बांधकामाचा खर्च वाढला होता. पण आता दर कमी झाल्याने अनेक किमतीत बदल झाले आहेत. सध्या सिमेंट, स्टील आणि विटांचे भाव कमी आहेत. त्यामुळे बिल्डरांची गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली. अशा स्थितीत ग्राहकांना आवडत्या घराच्या खरेदीची उत्तम संधी आहे. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बिल्डरांनी किमती स्थिर ठेवल्याचा फायदा ग्राहकांना होत आहे.

राज्य सरकारच्या धोरणाने रेतीची दरवाढबांधकाम व्यावसायिक म्हणाले, जानेवारी ते जून हा बांधकामाचा हंगाम असतो. या दिवसात बांधकामाचा वेग वाढतो. सोबतच कच्च्या मालाच्या किमतीही वाढतात. पण यंदा दरवाढ झाली नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे. मात्र, राज्य सरकारच्या धोरणाने रेतीचे भाव वाढले आहेत. रेती घाट वैधपणे सुरू केल्यास दर कमी होतील. त्या तुलनेत विटा, सिमेंट आणि स्टीलचे भाव कमी झाले आहेत.

निवडणुकीपर्यंत भाववाढीची शक्यता कमीचस्टीलची किंमत हंगामात कमी होणे, ही आश्चर्यकारक बाब आहे. ८ एमएम सळाख ४७.५० रुपये किलो आणि १२ ते २५ एमएचे भाव ४६ रुपये किलो आहेत. त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जातो. हे भाव दोन वर्षांच्या तुलनेत फारच कमी आहेत. बाजारात डिमांड कमी वा उत्पादन वाढल्याने भाव उतरले असावेत, असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत भाव वाढण्याची शक्यता नाहीच. नागपुरात स्टील देशाच्या सर्वच भागातून येते. शिवाय नागपुरातही स्टीलचे उत्पादन होते. भाव आणखी कमी झाल्यास ग्राहकांचा फायदा होईल.-राजेश सारडा, अध्यक्ष, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भ.

टॅग्स :nagpurनागपूर